'गोमेकॉ'त अनेकांचे जीव गेल्यानंतर सरकारला आता आली जाग

Beginning to install 20000 liter medical oxygen tank at GMCH
Beginning to install 20000 liter medical oxygen tank at GMCH

पणजी: गोमेकॉत(GOMECO) ऑक्सीजनच्या(Oxygen trolley ) ट्रॉली सिस्टीम अनेकांचे जीव घेतल्या नंतर उशिरा जाग आलेल्या सरकारने( BJP Government)आता गोमेकॉत 20 हजार लीटरचा मेडिकल ऑक्सीजन टँक बसवण्यास सुरुवात केली असून त्याचे काम युद्धपातळीवर आहे. दरम्यान  ऑक्सिजनचा टँकर कर्नाटकातून गोव्यात येत असताना मोले चेकनाक्यावर वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्याने काल रात्री तो अडविला. वाहनाची कागदपत्रे तपासताना वाहतूक निरीक्षक मंदार आडपईकर याने ‘सेस’ जमा न केल्याप्रकरणी टँकर चालकाला जाऊ दिले नाही. हा टँकर सुमारे 20 मिनिटे चेकनाक्यावर उभा करून ठेवण्यात आला. ऑक्सिजन लवकरात लवकर पोहचण्यासाठी आवश्‍यकता असताना या निरीक्षकाने टँकर थांबवून ठेवल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजली. त्यानंतर वरिष्ठांनी त्याला टँकर लगेच सोडण्याचा आदेश दिला व ऑक्सिजनचा टँकर थांबवून ठेवल्याप्रकरणी निरीक्षक मंदार आडपईकर याला सेवेतून निलंबित करण्यात आले. (Beginning to install 20000 liter medical oxygen tank at GMCH)

केंद्राकडून गोव्याला अतिरिक्त 20मे. टन ऑक्सिजन साठा 
केंद्र सरकारने गोव्याला 26 मे. टन द्रव्य वैद्यकीय ऑक्सिजन (LMO) उपलब्ध केला होता, त्यात अतिरिक्त 20 मे. टन ऑक्सिजनचे वाटप केले आहे. त्यामुळे गोव्याला आता केंद्राकडून 46 मे. टन ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पारदर्शकता व सुधारणा आणण्यासाठी गोमेकॉ इस्पितळातील ऑक्सिजन पुरवठा करण्यात झालेल्या गैरव्यवस्थापनाची चौकशी करण्यास त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. काल भारतीय हवाई दलाच्या विमाने गोव्यात 323 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स उपलब्ध झाले असल्याने स्थिती नियंत्रणासाठी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे ते म्हणाले. 

ऑक्सिजन टाकीचे काम युद्धपातळीवर 
कोरोनाग्रस्त रुग्णांना सुरळीत व अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्याबरोबरच ऑक्सिजन ट्रॉली सिस्टीमवर अवलंबून राहणे कमी करण्यासाठी सुपरस्पेशॅलिटी इस्पितळाच्या आवारात सुमारे 20 हजार लिटरची वैद्यकीय ऑक्सिजन टाकी बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम पूर्ण होताच त्यातून ऑक्सिजन पुरवठा सुरू केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

मृतदेह नेण्यासाठी शववाहिकेचे भाडेदरपत्रक  

गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार सरकारने 13मे रोजी आदेश काढून निश्‍चित केले आहे. वैयक्तिक तसेच एनजीओसाठी रिकाम्या सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी आवश्‍यक असलेल्या परवान्यासाठी काल सरकारने आरोग्य केंद्रांची नावे जाहीर केली आहेत. मे. स्कूप ऑक्सिजन प्रा. लि., कडून दोन डुरा सिलिंडर घेण्यात आले होते. ते मे. ऑक्सी नायट्रो यांच्या तांत्रिक मदतीने 13 मे ला संध्याकाळी 6 वा. उभारण्यात आले आहेत. हे सिलिंडर सुरळीत ऑक्सिजन पुरवठा दीर्घकाळासाठी करण्यासाठी सोयीचे होत आहेत. त्याला 28 ट्रॉलीवरील सिलिंडर जोडता येतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com