विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात

आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे गोविंद गावडे हे पहिले उमेदवार ठरले
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय (Politics) नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

Goa Assembly Election 2022
काँग्रेसची अजून एक यादी जाहीर

दरम्यान, 14 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) उमेदवारी अर्ज दाखल करायला आज पासून सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे गोविंद गावडे हे पहिले उमेदवार ठरले आहेत. त्यांनी 2017 ची विधानसभा निवडणूक (Election) अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती आणि नंतर भारतीय जनता पक्षाला (BJP) पाठिंबा दिला होता. त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (एमजीपी) दीपक ढवळीकर यांचा पराभव केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com