Goa News: वाळपई-बेळगाव अंतर कमी होणार

ठाणे पंचायत क्षेत्रातून पालीमार्गे जांभूळकडे (चोर्लाघाट) जाणाऱ्या रस्त्यांमुळे बेळगाव-वाळपईचे अंतर कमी होणार असून पर्यटनाचाही विकास होणार आहे.
Road |Goa News
Road |Goa NewsDainik Gomantak

Goa News: ठाणे पंचायत क्षेत्रातून पालीमार्गे जांभूळकडे (चोर्लाघाट) जाणाऱ्या रस्त्यांमुळे बेळगाव-वाळपईचे अंतर कमी होणार असून पर्यटनाचाही विकास होणार आहे. त्यासाठी हा रस्ता लवकरच पूर्ण करण्यात येतील.

त्यामुळे वाळपई परिसरातून बेळगावला जाणे सोयीचे होणार आहे, अशी माहिती आमदार दिव्या राणे यांनी दिली. त्यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

वाळपई नगरपालिका क्षेत्र, नगरगाव ग्रामपंचायत क्षेत्र, म्हाऊस पंचायत क्षेत्र सावर्डे पंचायत क्षेत्र, ठाणे पंचायत क्षेत्र यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा गोवा-बेळगाव-पाली रस्ता कामाला सुरूवात करण्यात आली.राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या कामासाठी संपूर्णपणे पेव्हर्स घालण्यात येणार असून यासाठी अंदाजे 1.50 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामुळे नागरिकांना चांगल्या प्रकारचे सुविधा उपलब्ध होणार आहे. या रस्त्यामुळे भविष्यात सुर्लातील पर्यटन विकासाला चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध होणार आहे, असेही आमदार डॉ. राणे यांनी सांगितले.

Road |Goa News
Lokotsav 2023: गोव्यातील लोकोत्सवात ढिसाळ व्यवस्थापनाचे प्रदर्शन

रस्ता कामाच्या शुभारंभप्रसंगी पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर, पंचायतीचे पंच सभासद निलेश परवार, सुरेश आयकर अनुष्का गावस, विनायक गावस, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलिंगकर, कनिष्ठ अभियंता चंदन नाईक, झिलबराव देसाई, पंचायतीचे सचिव सर्वेश गावकर, पांडुरंग गावकर उपस्थित होते.

अभियंते देवेंद्र वेलिंगकर म्हणाले, या रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने होणार आहे. पहिला टप्पा पूर्ण करणारे कॉन्ट्रॅक्टर जगदीश राणे यांना दुसऱ्या टप्प्याचे काम मिळाल्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत कोणत्याही प्रकारचा संशय घेण्याचे कारण नाही. सूत्रसंचालन उदय सावंत यांनी केले.

Road |Goa News
Vijay Sardesai : 'अर्थसंकल्पाने गोव्याला लोटले आर्थिक संकटात'

चोर्लाघाट मार्गाला रस्ता जोडणार

केरी-चोर्लाघाट मुख्य मार्गाला हा रस्ता जोडला जाणार आहे. ठाणे पंचायत क्षेत्रातील पाली गावातून हा रस्ता पुढे जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी रस्ता प्रस्तावा मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरवात झाली.

दोन वर्षांपूर्वी पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. हा रस्ता पूर्णपणे वनक्षेत्रातून जात आहे. त्यामुळे काही अचडणी होत्या. पण आत्ता हा रस्ता लवकर पूर्ण होईल, राणे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com