गोव्यातील मुलींच्या लग्नाला, शिक्षणाला आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत हवी असेल तर घ्या या योजनेचा लाभ

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

राज्यातील मुलींच्या लग्नाला, शिक्षणाला आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत हवी असेल, तर सरकारकडून लाडली लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत मदत केली जाते.

पणजी: राज्यातील मुलींच्या लग्नाला, शिक्षणाला आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत हवी असेल, तर सरकारकडून लाडली लक्ष्मी योजनेच्या अंतर्गत मदत केली जाते. यावर्षीच्या ऑकटोबर महिन्यापासून आतापर्यंत राज्यभरात एकूण २३१ मुलींना या योजनेचा लाभ झाल्याची माहिती मिळाली. 

दरम्यान, कोरोनामुळे देशभरात असणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इतर सरकारी खात्यांसह या खात्यातील काही गोष्टी आणि योजनांचे लाभ प्रलंबित स्वरूपात होते. मात्र, खात्याने तातडीने ज्या मुलींनी या योजनेच्या लाभासाठी अर्ज केले होते. त्यांना मदत करण्याहेतू अर्ज घेतले आणि या अर्जाची प्रक्रिया लगेच पूर्ण केल्याने या मुलींच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झाले असल्याची माहिती मिळाली. लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण असायला हवे. जी मुलगी हा लाभ शिक्षणासाठी घेत असेल तर तशी कागदपत्रे अर्जासोबत जोडायची असतात. यासंदर्भातील योग्य ते मार्गदर्शन पणजी येथील १८ जून रस्त्यावर असणाऱ्या खात्याच्या कार्यालयात केले जाते.

संबंधित बातम्या