Murder Case: आधी खून केला, मग त्याच डॉक्टरच्या एटीएममधून काढले 60 हजार

डॉक्टराचा खून केल्यानंतर चार संशयितांनी वाटेत वेगवेगळ्या ठिकाणी थांबून डॉक्टरचे एटीएम कार्ड वापरून पैसे काढले, अशी माहिती पुढे आली आहे.
Murder Case
Murder CaseDainik Gomantak

Murder Case: बेताळभाटी येथे राहणारे डॉक्टर निर्वाण भारत यांचा खून केल्यानंतर त्यांचीच गाडी घेऊन फरार झालेल्या त्या चार संशयितांनी वाटेत वेगवेगळ्या ठिकाणी थांबून डॉक्टरांचे एटीएम कार्ड वापरून पैसे काढले, अशी माहिती पुढे आली आहे. ही एकंदर रक्कम 60 हजारांच्या आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पोलिसांनी त्यांना अटक केल्यावर त्यापैकी 50 हजारांची रक्कम जप्त केली असून त्यांनी चोरलेली गाडी, लॅपटॉप आणि चोरलेले मोबाईल्सही जप्त केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिमांचल परिदाला डॉक्टरच्या एटीएम कार्डचा पीन क्रमांक माहीत होता.

Murder Case
Goa Murder Case: कामासाठी बोलावले अन् हातून करवला खून

संशयितांविरोधात गुन्हे नोंद

कोलवा पोलिसांनी आता या संशयितांच्या विरोधात खुनाच्या (कलम 302) आरोपाबरोबरच कटकारस्थान (कलम 120-ब) रचणे आणि जबरी चोरी (कलम 392) करणे, असे अतिरिक्त गुन्हे नोंद केले आहेत. सध्या हे चारही संशयित कोलवा पोलिसांच्या कोठडीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com