H3N2 Case In Goa: सावधान! गोव्यात H3N2 चा शिरकाव, सापडले 'इतके' रुग्ण

आरोग्य यंत्रणेकडून सतर्कतेचे आदेश
Influenza A (H3N2) Virus
Influenza A (H3N2) VirusDainik Gomantak

H3N2 Case In Goa देश आता कुठे कोरोनातून सावरत असताना H3N2 व्हायरसनं चिंता वाढवली आहे. गोव्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे.

याच बदलत्या वातावरणामुळे खोकला, सर्दीचा त्रास होत असून लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा त्रास जास्त होत असल्याचे दिसून येतेय.

त्यातच आता गोव्यात H3N2 चा शिरकाव झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. गोव्यात दोन H3N2 प्रकरणे आढळून आली आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

गोव्यात आज 17 कोरोनाच्या केसेस आढळून आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन कोविड-19 बाबतीत अलर्ट मोडवर आहेच परंतु आता H3N2 ने डोकेदुखी वाढवली आहे. प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून जनतेला कोविड संबंधी खबरदारीचे उपाय सुचवले जात असून आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

H3N2 विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या इन्फ्लूएंझापासून गंभीर आजाराचे रुग्ण आणि वृद्धांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Influenza A (H3N2) Virus
WPL 2023: युपी वॉरियर्सचं प्लेऑफचं तिकीट पक्क! अखेरच्या ओव्हरमध्ये गुजरात जायंट्सचा पराभव

H3N2 इन्फ्लुएंझा हा कोविडप्रमाणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. हा संसर्ग खोकल्याद्वारे पसरतो. म्हणूनच आपण मास्क वापरावा, हात नियमित धुवावेत आणि सामाजिक अंतर पाळलं पाहिजे.

मधुमेह तसेच गंभीर आजाराच्या रुग्णांनी जास्त काळजी घेणं आवश्यक आहे, कारण त्यांना संसर्गाचा धोका जास्त आहे. ताप, खोकला आणि वाहणारं नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब ही H3N2 विषाणूची काही प्रमुख लक्षणे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com