काबाडकष्ट करुन उदरनिर्वाह करतात, मच्छीमारांच्या विरोधात अपशब्द काढाल तर खबरदार!

सज्जड इशारा रिव्‍हॉल्युशनरी गोवन्सचे प्रशांत पागी यांच्याकडुन.
काबाडकष्ट करुन उदरनिर्वाह करतात, मच्छीमारांच्या विरोधात अपशब्द काढाल तर खबरदार!
FishingDainik Gomantak

काणकोण : राज्यातील मच्छीमारांच्या विरोधात यापुढे एक जरी अपशब्द काढाल, तर खबरदार, असा सज्जड इशारा रिव्‍हॉल्युशनरी गोवन्सचे प्रशांत पागी यांनी दिला आहे. वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी गोव्यातील मच्छीमारांना व विक्रेत्यांना ‘फटिंग’ असे संबोधले होते. रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे काणकोण (Canacona) समन्वयक प्रशांत पागी यांनी ‘त्या’ विधानाचा निषेध केला.

Fishing
म्हादई नदीचे संवर्धन गरजेचे!

गोव्यातील मच्छीमार (Fishing) बांधवांना सरकार मदत देत नाही. ते स्वतःहून आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी काबाडकष्ट करीत आहेत. जीव मुठीत घेऊन समुद्राचा प्रवास करून आज राज्याच्या जनतेला मासे पुरवण्याचे ते काम करत आहेत. अशा कष्टाळू बांधवांना ‘फटिंग’ असे संबोधणे हे लोकप्रतिनिधीला अशोभनीय आहे. कोरोनाच्या काळात मच्छीमारांनी व्यवसाय गमावला. त्यावेळी त्यांना मदत करण्याचे सोडून आपल्या घरी निवांत होते. आता त्‍यांना ‘फटिंग’ संबोधणे अयोग्‍य आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com