भाईड कोरगाव परिसरात दोन अनोळख्या म्हशी

dainik gomantak
शनिवार, 16 मे 2020

वाट चुकलेल्‍या या म्‍हशी शोधाशोध केल्‍यावर शेतकरी नदीच्या पलीकडे जाऊन आणत असत. पण, सध्या कोरोना महामारीमुळे एकमेकांच्‍या हद्दीत जाता येत नाहीत.

पेडणे, 

भाईड - कोरगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून दोन दुभत्या म्हशी भटकत असून काही वेळा शेतकऱ्यांच्या परसबागेतील भाजीपालाही फस्त करीत आहेत. दोन्ही म्हशींच्या कानाला बिल्ला असून शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनेद्वारे या म्हशी घेतल्या आहेत, असे त्यावर असलेल्या उल्लेखानुसार त्या सिंधुदुर्ग परिसरातील असाव्‍यात, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.
तेरेखोल नदीला जेव्हा ओहोटी असते, त्यावेळी काहीवेळा गोव्याच्या हद्दीतील म्‍हशी सिंधुदुर्गात, तर काहीवेळा सिंधुदुर्ग भागातील म्हशी तेरेखोल नदी पार करून गोव्याच्या हद्दीत येतात. वाट चुकलेल्‍या या म्‍हशी शोधाशोध केल्‍यावर शेतकरी नदीच्या पलीकडे जाऊन आणत असत. पण, सध्या कोरोना महामारीमुळे एकमेकांच्‍या हद्दीत जाता येत नाहीत. शेतकऱ्यांना आपल्या म्हशी गोव्याच्या हद्दीत येऊन शोधता येत नाहीत. या म्‍हशी सावरजुवे आरोंदा आदी भागातील असण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या