भाजप राष्ट्रीय युवा मोर्चाची नवी दिल्लीत बैठक

दिल्लीतील बैठकीसाठी गोवा प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर आणि सरचिटणीस उपस्थित राहणार
भाजप राष्ट्रीय युवा मोर्चाची नवी दिल्लीत बैठक
Bharatiya Janata Yuva Morcha meet in New DelhiDainik Gomantak

पणजी: भारतीय जनता पक्षाच्या(BJP) राष्ट्रीय युवा मोर्चाची मंगळवार दि. 5 आणि बुधवार दि. 6 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय बैठक होणार आहे. या बैठकीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या देशभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीसाठी गोव्यातून (Goa BJP) गोवा प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष समीर मांद्रेकर आणि सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.

Bharatiya Janata Yuva Morcha meet in New Delhi
Goa: प्रत्येक बूथवर केजरीवालांची 'रोजगार हमी' पोहचविण्यासाठी आप सज्ज

देशातील 5 राज्यात 2022 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 2022 च्या सुरुवातीला गोवा विधानसभेच्या निवडणुका आहेत. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून पक्षाने विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Related Stories

No stories found.