Bhausaheb Bandodkar : 50व्या पुण्यतिथी निमित्त म्‍हापशात वर्षभर उपक्रम

भाऊसाहेबांमुळे सामान्य माणूस ज्ञानसंपन्न झाला
Bhausaheb Bandodkar Birth Anniversary
Bhausaheb Bandodkar Birth AnniversaryDainik Gomantak

भाऊसाहेब बांदोडकर हे खऱ्या अर्थाने मुक्त गोव्याचे दिशादर्शक ठरले. बहुजन समाजाला स्वाभिमानाने जगण्याची ताकद त्‍यांनी दिली. येत्या ऑगस्टमध्ये भाऊसाहेब बांदोडकरांची 50वी पुण्यतिथी आहे. तेव्हा म्हापसा शहरात पुण्यतिथीचा कार्यक्रम वर्षभर विविध उपक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती भाऊप्रेमी तथा माजी नगरसेवक तुषार टोपले यांनी दिली.

म्हापसा येथील श्री महारुद्र देवस्थानच्या समोरील भाऊसाहेबांच्या पुतळ्याला ज्येष्ठ शिक्षक दामोदर (बाबू) नाटेकर व समाजकल्याण खात्याचे निवृत्त संचालक सुभाष शिरोडकर यांनी पुष्पहार अर्पण करून प्रमुख पाहुणे या नात्याने अभिवादन केले.

Bhausaheb Bandodkar Birth Anniversary
Bhausaheb Bandodkar : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या संकुलाला देणार भाऊंचे नाव : गोविंद गावडे

भाऊंच्‍या 112व्या जयंतीदिनी मगो नेते भारत तोरस्कर, केंद्रीय समिती सदस्य श्रीपाद येंडे, एकनाथ म्हापसेकर, नगरसेविका शुभांगी वायंगणकर, नगरसेखर चंद्रशेखर बेनेकर, डॉ. नूतन बिचोलकर, रमेश मणेरकर, नारायण राठवड, प्रेमानंद दिवकर, सचिन किटलेकर, शेखर कवळेकर, राजू कुडतरकर, गुरुदास वायंगणकर, सुभाष येंडे, हेमंत दिवकर आदी भाऊप्रेमींनी अभिवादन केले.

भाऊसाहेब बांदोडकर यांनी गावागावांमध्ये शिक्षणाची गंगा आणल्यामुळे सामान्य माणूस ज्ञानसंपन्न झाला व उच्चपदावर पोचला. मात्र दुर्दैवाने या मंडळींना आज भाऊसाहेबांचा विसर पडला आहे.

भाऊसाहेबांचे कार्य सामान्य जनतेपुढे नेण्यासाठी संघटित कार्य करुया, असे आवाहन पत्रकार तथा माजी नगरसेवक नारायण राठवड यांनी केले. नगरसेविका शुभांगी वायंगणकर, डॉ. नूतन बिचोलकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com