कुर्टी-खांडेपार उपसरपंचपदी भिका केरकर

Dainik Gomantak
शनिवार, 23 मे 2020

भिका केरकर यांना नसिमा मुल्ला, शर्मिला सांगावकर, सुधीर राऊत, नावेद तहसीलदार, सांतान फर्नांडिस व दादी नाईक या पंचायत सदस्यांनी समर्थन दिले

फोंडा

कुर्टी - खांडेपार पंचायतीचे पंच भिका केरकर यांची पंचायतीच्या उपसरपंचपदी निवड झाली आहे. उपसरपंचपदासाठी आज (शुक्रवारी) झालेल्या निवडणुकीत भिका केरकर व गुरुदास ऊर्फ सुनील खेडेकर या दोन्ही पंचानी उमेदवारी दाखल केली होती. यावेळी झालेल्या निवडणुकीत भिका केरकर यांना सात तर गुरुदास ऊर्फ सुनील खेडेकर यांना चार मते मिळाली.
भिका केरकर यांना नसिमा मुल्ला, शर्मिला सांगावकर, सुधीर राऊत, नावेद तहसीलदार, सांतान फर्नांडिस व दादी नाईक या पंचायत सदस्यांनी समर्थन दिले तर सुनील खेडेकर यांना पंचायत सदस्य रुक्‍मा खांडेपारकर, श्रावणी गावडे व सरपंच असलेले शैलेश शेट यांनी समर्थन दिले होते. दरम्यान, भिका केरकर हे या पंचायतीचे ज्येष्ठ पंचसदस्य असून यापूर्वी त्यांची सरपंचपदीही निवड झाली होती. या पंचायतीचे उपसरपंच असलेले शैलेश शेट यांची सरपंचपदी वर्णी लागल्यामुळे उपसरपंचपद रिक्त झाले होते. फोंडा गटविकास कार्यालयाचे विस्तार अधिकारी तसेच पंचायत सचिवाने कामकाज हाताळले.

संबंधित बातम्या