Goa Culture: जुने गोवेत भोलेनाथांची नवसाची पालखी; भाविकांची अलोट गर्दी

शिव मंदिर उपपीठावर उत्साहात परिक्रमा, सहा जिल्ह्यांतील भाविक उपस्थित
Goa Culture
Goa CultureDainik Gomantak

निःस्वार्थी, निःस्पृह भाविक, भक्त देवाला या सद्‍गुरूरुपी देवाला मानतो, पूजतो तो कितीही उन्हात, कडाक्याची थंडीतही नवसाची पालखी, उत्सव उत्साहात साजरा करतो. आजच्या अमावास्येला जुने गोवे येथील शिव मंदिरात उपपीठावर नवसाचा पालखी उत्साह साजरा करण्यात आला.

Goa Culture
Verna IDC: वेर्णा औद्योगिक वसाहतीत एमएसएमई इन्क्युबेशन पार्क; उद्योग विकासाचा उद्देश

भोलेनाथ व नरेंद्रचार्य महाराज यांची पालखीतून परिक्रमा काढण्यात आली. नवसाची पालखी म्हणून ख्याती असल्याने गोव्यातील बाराही तालुक्यातील नवीन तसेच जुने शिष्य, साधक, भाविक, भक्त, हितचिंतक या पालखी सोहळ्याला आवर्जून उपस्थित असतात. तसेच गोव्यातील उपपीठावर सहा जिल्ह्यांतून भाविक येतात. यात सिंधुदुर्ग, बेळगाव, उत्तर कन्नड, धारवाड, कारवार, जोयडा या जिल्ह्यांतील भाविक सहभागी होतात.

जुने गोवे येथील शिवमंदिर उपपीठावर अनंत विभूषित रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम उपपीठ गोवा यांच्या भक्तसेवा मंडळातर्फे नवसाची पालखी उत्सव सोहळा आयोजित केला जातो.

नवसाच्या पालखी उत्सव सोहळ्याला सकाळी काकड आरतीने सुरुवात‌ होते. त्यानंतर होमहवन, पूजा केली जाते. प्रत्यक्ष १७ व अप्रत्यक्ष २१ अभिषेक करण्यात आले. आजच्या पालखी सोहळ्याला २७५० च्या वर भाविकांची उपस्थिती होती. यावेळी दुपारी व रात्री महानैवेद्याचा आस्वाद घेतला.

संध्याकाळी ठीक ५ वाजता ढोल ताशांच्या गजरात, ताळ-मृदंगाच्या ताला-सुरात भोलेनाथांची व नरेंद्राचार्य महाराजांची मंदिराच्या परिसरात पालखीतून परिक्रमा काढण्यात आली. संध्याकाळी ७.०० वाजता सांजारती, श्रींच्या भेटीस आलेल्या वस्तूंची पावणी घालण्यात आली. शेवटी गाऱ्हाणे घालून पालखी उत्सव सोहळा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com