Bicholim News: डिचोलीत फूटसाल, बायोमिथेनेशन प्रकल्प

डॉ. चंद्रकांत शेट्ये ः पिराची कोंड येथे हॉटमिक्स डांबरीकरण
Bicholim News
Bicholim NewsDainik Gomantak

Bicholim News डिचोली शहरातील हावजिंग बोर्ड येथे फूटसाल मैदान आणि बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असून, लवकरच या कामांना चालना मिळणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली. डिचोली पालिका क्षेत्रातील पिराची कोंड येथील लिंगेश्वर कॉलनीत हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ केल्यानंतर आमदार डॉ. शेट्ये बोलत होते.

डिचोली मतदारसंघातील जनतेला प्रामुख्याने चांगल्या दर्जाच्या पाणी, वीज आणि रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे. हेच माझे उद्धीष्ट्य आहे. अशी ग्वाही डॉ. शेट्ये यांनी दिली. सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे 20 लाख रुपये खर्च करुन पिराची कोंड येथील रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येत आहे.

या कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक गुंजन कोरगावकर, नगरसेविका ॲड. रंजना वायंगणकर आणि दीपा पळ, माजी नगरसेवक बाबू गोवेकर, सार्वजनिक बांधकाम खात्याची कार्यकारी अभियंता रश्मी मयेकर यांच्यासह अरुण मांद्रेकर, शंकर बेतकीकर, श्री. गावठणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यापूर्वी आमदार डॉ. शेट्ये यांनी बोर्डे येथील श्री वडेश्वर देवाचे आशीर्वाद घेतले.

Bicholim News
Bicholim News: साष्टीवाडा-तिखाजनपर्यंतच्या बगलमार्गाने वाहतूक कोंडीची समस्या सुटणार- प्रेमेंद्र शेट

कासारपाल येथे रस्ताकाम

तत्पूर्वी लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील कासारपाल येथे आमदार डॉ. शेट्ये यांनी रस्ता दुरुस्ती आणि हॉटमिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ केला. सुमारे ५६ लाख रुपये खर्च करुन पाऊण किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. यावेळी सरपंच पद्माकर मळीक, उपसरपंच त्रिशा राणे, पंचसदस्य पूजा घाडी, कृष्णन आरोलकर, निलम कारापूरकर, रामा गावकर, नरेश गावस आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com