डिचोली शहरात अपघातात चालक बचावले

accident
accident

डिचोली

डिचोली शहरात काल (शनिवारी) आणि आज (रविवारी) मिळून झालेल्या अपघातात सुदैवाने दोघेजण बचावले. मात्र, दोन्ही अपघातातील चालक जखमी झाले. आज (रविवारी) सायंकाळी पडलेल्या पावसानंतर शहरातील न्यायालय इमारतीकडून बाजारात जाणाऱ्या रस्त्याजवळील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकावर स्कूटर उसळल्याने स्कूटरसह चालक पडण्याची घटना घडली.
यासंबधीची माहिती अशी की, आज (रविवारी) सायंकाळी पडलेल्या पावसाने उसंत घेतल्यानंतर शहरातील न्यायालय इमारतीकडून बाजारात जाणाऱ्या रस्त्याजवळ मुख्य रस्त्यावरील स्कूटर उसळून पडल्याने स्कूटरचालक जखमी होण्याची घटना घडली. जीए-०७ जे-६५१४ या क्रमांकाची स्कूटर जुन्या बसस्थानकाच्या दिशेने जात होती. गतिरोधकावर उसळी घेतल्याने स्कूटर साधारण पाच ते सहा मीटर अंतरावर जावून पडली. त्यात चालक रस्त्यावर जोरात आदळला. बराचवेळ चालक बेशुध्द अवस्थेत निपचीप पडला होता. तेथील दुकानदार आणि नागरिकांनी बेशुध्दावस्थेतील स्कूटरचालकाला शुध्दीवर आणले. तोपर्यंत १०८ रुग्णवाहिकेला बोलावून उपचारार्थ त्याला डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. स्कूटरचालक म्हापसा येथील असल्याचे समजते.

व्हाळशी येथे अपघात..!
रुंदीकरण करण्यात आलेल्या शहरातील महामार्गावर व्हाळशी येथे काल (शनिवारी) मोटारगाडीला अपघात होवून डिचोलीतीलच एक इसम जखमी झाला. डिचोलीहून म्हापसाच्या दिशेने जाताना आयटीआयपासून पुढे काही अंतरावर मोटारगाडीची उजव्या बाजूने कापलेल्या झाडाच्या जमिनीतील बुंद्याला जोराची धडक बसली .ही धडक एवढी जोरात होती, की मोटारगाडीने दिशा बदलताना महामार्गावर मधोमध आडवी झाली. या अपघातात चालक जखमी होताना सुदैवाने बचावला. मोटारगाडीच्या दर्शनी भागाची मोडतोड झाली. या अपघातावेळी मोटारगाडीतून महामार्गावर इंधन सांडले होते. स्थानिकांनी लागलीच त्यावर माती टाकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com