डिचोली तालुक्यात कोरोनाचा खाण आस्थापनात शिरकाव

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

डिचोलीत दिवसभरात ५७ कोरोनाबाधित

डिचोली: डिचोली तालुक्यात कोरोनाचा धोका वाढतच असून कोरोना संसर्गाने एका खाणीसह काही उद्योग आस्थापनात शिरकाव केला आहे. डिचोली तालुक्यातील एका खाणीसह उद्योग आस्थापनात काही कामगार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे संबंधित आस्थापनात खळबळ माजली आहे. 

डिचोली तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांनी पुन्हा अर्धशतक पार केले आहे. आज शनिवारी तालुक्यात ५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील डिचोली  विभागात २० रुग्ण, साखळी  विभागात २२ रुग्ण, तर मये विभागात १५ कोरोनाबाधित आढळले आहेत, अशी माहिती मामलेदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. शनिवारी डिचोली विभागात १९०,  मये विभागात १५० आणि साखळी विभागात १९५ मिळून तालुक्यात एकूण ५३५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. आज डिचोलीत १२, मयेत २३ आणि साखळीत २६ मिळून तालुक्यात ६१ रुग्ण बरे झाल्याची माहिती मिळाली आहे. तालुक्यातील ५७ रुग्ण कोविड सुविधा केंद्रात उपचार घेत आहेत, तर डिचोलीत - १६५, मयेत - १२९ आणि साखळीत - १६६ मिळून ४६० रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. तालुक्यातील  १८ रुग्णांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत, अशी माहिती डिचोलीच्या मामलेदार कार्यालयातून मिळाली आहे.
 

संबंधित बातम्या