Bicholim News : देवस्थान समिती बरखास्त करून वाद मिटवा

मये गावातील नाईक गावकरांसह अन्य कुटुंबांची सरकारकडे मागणी
Maye Villegers
Maye VillegersDainik Gomantak Digital Team

Bicholim News : डिचोली मये गावातील देवस्थानच्या अधिकारावरून सुरू असलेल्या वादप्रश्नी सरकारने गांभीर्याने लक्ष घालून हा गुंता कायमचा सोडवावा. सध्याची श्री माया केळबाई पंचायतन देवस्थान समिती बरखास्त करावी. सरकारने देवस्थान ताब्यात घेऊन महाजनकी आदी वाद सोडवावेत, अशी जोरदार मागणी नाईक गावकर, गावस, गोसावी आणी चारी कुटुंबियांच्यावतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरी नाईक गावकर आणि शिवा नाईक गावकर यांनी केली आहे.

सोमवारी श्री केळबाई देवस्थान मंडपात घेतलेल्या या पत्रकार परिषदेस वरील सर्व घराण्यांतील महिला आणि पुरुष मिळून पन्नासहून अधिकजण उपस्थित होते.

नाईक गावकर, गावस, गोसावी आणि अन्य कुटुंबांना देवस्थानच्या प्रत्येक उत्सवात अधिकार आहेत. तरीदेखील या कुटुंबांना अंधारात ठेवून देवस्थानच्या घटनेतील नियम बेकायदेशीरपणे तयार करून या कुटुंबांना महाजनकीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायलयात दाद मागितली.

न्यायालयाचा आदेश असूनही देवस्थान समितीकडून आम्हाला महाजन करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येते. सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावांची माहितीही देण्यात येत नाही. प्रशासकीय यंत्रणेकडून कानावर हात ठेवण्यात येतात, असा दावा शिवा नाईक गावकर यांनी केला.

Maye Villegers
Panaji Municipal budget : मनपाचे अंदाजपत्रक पाच मिनिटात मंजूर

प्रशासकीय यंत्रणेत उणीव

मयेतील देवस्थानशी संबंधित उत्सवांवेळी वाद निर्माण होऊन उत्सव बंद पडतात. तेव्हा प्रशासन वस्तुस्थिती जाणून घेत नाहीत. प्रत्येकवेळी नाईक गावकर आणि अन्य कुटुंबीयांना दोषी धरण्यात येते. वाद आणि उत्सव बंद पडण्यास देवस्थान समितीच जबाबदार आहे. याप्रकरणी ‘सुवर्णमध्य’ काढून वाद कायमचा सोडविण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. राजकीय दबावही याला जबाबदार आहे. असा दावा हरी नाईक गावकर यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com