डिचोलीतील लामगाव रात्रभर काळोखात

झाडांची पडझड : 18 तासांच्या प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा सुरळीत
Bicholim in darkness for 18 hours
Bicholim in darkness for 18 hours Dainik Gomantak

डिचोली : झाडांची पडझड झाल्याने गुरुवारी रात्रभर अंधारात बुडालेल्या डिचोलीतील लामगाव भागात अखेर काल सायंकाळी जवळपास अठरा तासांच्या प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. गुरुवारी रात्री पावसासह सुटलेल्या वाऱ्यावेळी लामगाव येथे झाडांची पडझड झाली. (Bicholim in darkness for 18 hours goa)

Bicholim in darkness for 18 hours
कचरा प्रक्रिया प्रकल्पाला वेर्णा परिसरातही विरोध

या पडझडीत वीजवाहिन्या तुटल्या. फणसाचे एक मोठे झाड पडल्याने विजेच्या दोन खांबांची मोडतोड झाली. वीजवाहिन्या तुटल्याने गुरुवारी रात्री साठेआठ वाजण्याच्या सुमारास पूर्ण लामगाव भागातील वीजपुरवठा खंडित झाला. रात्रभर तसेच दुसऱ्यादिवशी दुपारपर्यंत लामगावात बत्ती ‘गुल’ होती.

वीज दुरुस्तीला अडथळा

रात्रीची वेळ आणि दुसऱ्या बाजूने पावसाची रीपरीप यामुळे गुरुवारी रात्री तातडीने वीज दुरुस्तीचे काम हाती घेण्यात अडथळा निर्माण झाला. त्यामुळे रात्रभर संपूर्ण लामगाव भाग अंधारात राहिला. शुक्रवारी सकाळपासून वीज खात्याने युद्धपातळीवर दुरुस्तीकाम हाती घेताना दुपारपर्यंत वीज प्रवाह जाग्यावर घातला. दुपारी सव्वातीन वाजता लामगावातील वीजपुरवठा सुरळीत झाला; तर डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्रीच धावपळ करून झाडांचे अडथळे दूर केले.

Bicholim in darkness for 18 hours
सरकारी कर्मचारी संघटनेची आज निवडणूक

अनर्थ टळला

वीजवाहिन्या तुटताच भरवस्तीत विद्युतभारीत वीजवाहिनी पडण्याची घटना घडली. वेळीच वीजप्रवाह बंद केल्याने कोणताच अनर्थ घडला नाही, अशी माहिती नगरसेवक सुदन गोवेकर यांनी दिली. पावसाची पर्वा न करता अग्निशामक दल, वीज खाते आणि अन्य प्रशासकीय यंत्रणेने मदतकार्य केल्याने गोवेकर यांनी संबंधितांना धन्यवाद दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com