डिचोली इनरव्हील क्लबचे अधिकारग्रहण उत्साहात

डिचोली इनरव्हील क्लबचा चौथा अधिकारग्रहण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला.
bicholim Innerwheel Club takes over in goa
bicholim Innerwheel Club takes over in goa Dainik Gomantak

डिचोली : डिचोली इनरव्हील क्लबचा चौथा अधिकारग्रहण सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. येथील रोटरी हावसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणी म्हणून पणजी इनरव्हील क्लबची मावळती अध्यक्ष मनीषा सरदेसाई उपस्थित होत्या. यावेळी डिचोली रोटरी क्लबचे अध्यक्ष दुर्गेश कारापूरकर आदी उपस्थित होते.

(bicholim Innerwheel Club takes over in goa)

bicholim Innerwheel Club takes over in goa
Goa Corona Update : 112 जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू

मनीषा सरदेसाई यांनी रूपा लाड यांच्या अध्यक्षतेखालील इनरव्हील क्लबच्या सदस्यांना अधिकार ग्रहण केले. यावेळी बोलताना मनीषा सरदेसाई यांनी मावळत्या अध्यक्ष डॉ. कशिश पाटणेकर यांच्या नेतृत्वाखाली क्लबने केलेल्या कार्याची प्रशंसा केली.

दुर्गेश कारापूरकर यांनी इनरव्हील क्लब आरोग्य आदी क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय उपक्रम राबवित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अंजली एस. दीक्षित यांनी आभार मानले.

इनरव्हील क्लबचे पदाधिकारी

रूपा लाड यांच्या अध्यक्षतेखालील इनरव्हील क्लबचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे- उपाध्यक्ष-तारा सरदेसाई, सचिव-अंजली एस. दीक्षित, सहसचिव-स्नेहा फळारी, खजिनदार-शिल्पा देसाई, सहखजिनदार- डॉ. समीरा फळारी, आयएसओ-मिलिंदा कामत, संपादक- ॲड. स्मिता म्हार्दोळकर, कार्यकारी सदस्य-डॉ. ज्योती सावंत, पूजा सावंत, पुष्पा सरदेसाई, संतोषी नाईक आणि लिंदा तेली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com