ऐतिहासिक नाट्यस्पर्धेत डिचोलीच्या कला उन्मेषचे "रणांगण"

पानिपतच्या लढाईचा धगधगता अंगार असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन नरेश आनंद कडकडे यांनी केले असून, शिवराम फळारी निर्माता आहेत.
ऐतिहासिक नाट्यस्पर्धेत डिचोलीच्या कला उन्मेषचे "रणांगण"
ऐतिहासिक नाट्यस्पर्धेत डिचोलीच्या कला उन्मेषचे "रणांगण"Dainik Gomantak

डिचोली: राजीव कलामंदिर, फोंडा आयोजित ऐतिहासिक नाट्यस्पर्धेत येत्या मंगळवारी (ता.30) सायंकाळी 7 वा. कला उन्मेष डिचोली प्रस्तुत आणि विश्वास पाटील लिखित "रणांगण" हे नाटक सादर करण्यात येणार आहे.

ऐतिहासिक नाट्यस्पर्धेत डिचोलीच्या कला उन्मेषचे "रणांगण"
डिचोली-साखळी रस्ता अखेर खड्डेमुक्त

पानिपतच्या लढाईचा धगधगता अंगार असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन नरेश आनंद कडकडे यांनी केले असून, शिवराम फळारी निर्माता आहेत. दीपक बर्वे (नेपथ्य), विठ्ठल वेर्णेकर (वेशभूषा), जितेंद्र परब (रंगभूषा), संतोष शेटकर (प्रकाशयोजना) सरिता कडकडे (नृत्य दिग्दर्शन) तर जवाहर बर्वे पार्श्वसंगीताची बाजू सांभाळणार आहेत.

ऐतिहासिक नाट्यस्पर्धेत डिचोलीच्या कला उन्मेषचे "रणांगण"
IFFI 2021: त्यांना योग्य सन्मान कधी मिळेल?

या नाटकात नरेश कडकडे, मिलिंद बर्वे, साजी वेर्णेकर, समित मणेरकर, श्याम शेटगावकर, नरेश पेडणेकर, विराज शिरोडकर, रुपेश गावस, संदेश नाईक, अथर्व मांद्रेकर, बाळकृष्ण नाईक, सिद्धार्थ मांद्रेकर, अविनाश नाईक, सागर गावस, बालाजी मयेकर, अनिल गोवेकर, माया पंडित, दीपा जांभळे, प्रांजल मराठे आणि सरिता कडकडे या प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तर अमेय आळवी, विनायक च्यारी, नरसिंह नाईक, खनिद वेर्णेकर, विनायक फोगेरी, जितेंद्र फोगेरी, कशिश हिंदे, साईराज गोवेकर आणि संतोष मांद्रेकर सहकलाकार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com