डिचोलीतील बाजार संकुलातील त्या जागेच्या वादावर पडदा

गुपचूपपणे चाललेल्या या कामामुळे बाजार संकुलातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली होती.
डिचोलीतील बाजार संकुलातील त्या जागेच्या वादावर पडदा
Bicholim market complex building case Dainik Gomantak

डिचोली: डिचोली (Bicholim) बाजार संकुल इमारतीतील 'त्या' मोकळ्या जागेतील काम अखेर पालिकेने हटविले आहे. बाजार संकुलातील विनावापर मोकळ्या जागेत एका दुकानदाराने गुपचूपपणे छताला पीओपी करण्याचे काम हाती घेतले होते. काही प्रमाणात कामही केले होते. या कामामुळे बाजारात अनेक तर्कवितर्क वर्तविण्यात येत होते.

Bicholim market complex building case
Goa Rain Updates: परतीच्या पावसाचा डिचोलीत तडाखा

बाजार संकुलातील फळविक्रेत्यांसमोरील दुकान क्रमांक-20 ला टेकून असलेल्या मोकळ्या जागेत दोन दिवसांपूर्वी सुटीचा फायदा घेत काम सुरु केले होते. या मोकळ्या जागेतच विक्रेत्यांनी श्री लक्ष्मी देवीचा फोटो लावला आहे. गुपचूपपणे चाललेल्या या कामामुळे बाजार संकुलातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली होती. बाजार संकुलातील विक्रेत्यांनी आवाज केल्यानंतर संबंधित दुकानदाराने काम बंद केले होते. तत्संबंधी सोमवारी दै. 'गोमन्तक' मधून वृत्तही प्रसिद्ध झाले आहे. अखेर सोमवारी सकाळीच पालिकेच्या कामगारांनी मोकळ्या जागेत थोडक्यात केलेले काम हटविले. त्यातच महिला स्वयंसाहाय्य गटांना व्यवसाय करण्यासाठी वगळता ही जागा कोणालाही परस्पर दिली नसल्याचे स्पष्ट केल्याने या विषयावर तूर्तास पडदा पडल्यातच जमा आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com