डिचोली शहरात मोकाट गुरांची धरपकड सुरु

तीन दिवसात 12 गुरे पकडली, गोशाळेत रवानगी
डिचोली शहरात मोकाट गुरांची धरपकड सुरु
डिचोली शहरात मोकाट गुरांची धरपकड सुरु Dainik Gomantak

डिचोली: बऱ्याच दिवसानंतर डिचोली (Bichalom) पालिकेने शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या गुरांविरोधात पुन्हा मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी मिळून गेल्या तीन दिवसात बारा गुरे पकडून त्यांची रवानगी सिकेरी-मये येथील गोशाळेत करण्यात आली आहे. ही मोहीम (Campaign) आता चालूच राहणार आहे. अशी माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुरांना पकडण्याच्या पालिकेच्या मोहिमेला 'ब्रेक'(Brake) लागला होता.

आता सिकेरी येथील गोशाळेच्या सहकार्याने पुन्हा मोहीम हाती घेण्यात आली आहे. पालिकेचे कर्मचारी मईलप्पा यांच्या देखरेखीखाली ही मोहीम राबविण्यात येत असून, गुरांना पकडल्यानंतर पुढील व्यवस्था होईपर्यंत त्यांना बंदिस्त करून ठेवण्यात येत आहे. त्यासाठी मुस्लिमवाडा भागात खास व्यवस्था करण्यात आली आहे.

डिचोली (Bicholim) शहरात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. शहरात विविध ठिकाणी ही गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस (Transportation) अडथळा निर्माण होत असतो. काही गुरे तर चक्क बाजारात बेधडकपणे फिरत असतात. व्यापारी आणि ग्राहकांसह प्रवासी(Passenger)आणि इतर नागरिकांना या गुरांच्या उपद्रवास सामोरे जावे लागत आहे. बाजारात (Market) हिंडणारी काही गुरे ग्राहकांवर हल्लेही करतात या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी व्यापारी आणि ग्राहकांची (Customer)आहे.

डिचोली शहरात मोकाट गुरांची धरपकड सुरु
सनबर्न होणार नाही,मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

230 गुरे गोशाळेत

गोमंतक गोसेवक महासंघाशी पालिकेने करार केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 230 गुरांना पकडण्यात आली. गुरांना पकडल्यानंतर त्यांची रवानगी गोसेवक महासंघाच्या सिकेरी-मये येथील गोशाळेत करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com