न्‍हावेलीतील खून कौटुंबिक कारणासाठी?

प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

भावासह चौघेजण ताब्यात, खूनी पोलिसांच्या जाळ्यार्यंत

डिचोली:  न्हावेली-साखळी येथील मजूर कंत्राटदार खूनप्रकरणी पोलिस तपासाला वेग आला असून, पोलिसांच्या हाती महत्त्‍वाचे धागेदोरे लागले आहेत. या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाला योग्य दिशेने गती देताना मयत कंत्राटदाराच्या भावासह चार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. रविवारी रात्री उशिरार्यंत पोलिस तपासकामात व्यस्‍त होते. ताब्यात घेतलेल्या संशयितांची उलटतपासणी आणि जबानी घेण्याचे काम सुरू होते. 

पोलिसांनी महत्त्‍वाचे पुरावे गोळा केले असून, जमेदार याची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे जप्त करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या हाती आलेले धागेदोरे आणि गोळा केलेले पुरावे पाहता, पोलिसांचे जाळे संशयित खुन्यापर्यंत पोहोचले आहे. लवकरच खुनी जेरबंद होणार असल्याचा पोलिसांना विश्वास आहे. मुख्य सूत्रधाराला जेरबंद केल्यानंतरच खुनामागचे नेमके कारण आणि खून प्रकरणात एकट्याचा की अन्य कोणाचा सहभाग आहे, ते स्पष्ट होणार आहे. आतापर्यंतच्या तपासात या खून प्रकरणात मयत कंत्राटदाराच्या एकदम जवळच्या व्यक्‍तीचा हात असल्याची माहिती समोर आली. खून प्रकरणामागे गूढ निर्माण झाले असले, तरी अनैतिक संबंधाच्या कारणातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. मागील मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या आणि साखळी येथे राहणाऱ्या मूळ पश्‍चिम बंगालमधील जमेदार रेहमान या मजूर कंत्राटदाराचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह न्हावेली-साखळी येथील मोहीत इस्पात या औद्योगिक आस्थापनापासून काही अंतरावरील झाडीत आढळून आला होता. मृतदेहाचे तुकडे तीन ठिकाणी आढळून आल्याने धारदार हत्याराने त्याची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई आणि निरीक्षक संजय दळवी यांच्या नेतृत्त्‍वाखाली खून प्रकरणाचा तपास करीत आहेत. तपासकामात वाळपई पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे.

सहा महिन्यापूर्वी मागील फेब्रुवारी महिन्यात साखळी परिसरात एका विवाहित महिलेचा खून करण्याची घटना घडली होती. मागील २८ फेब्रुवारी रोजी कुळण-कारापूर येथे कालव्यात धनश्री धर्मा मोरजकर या रावण-सत्तरी येथील विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला होता. 

संबंधित बातम्या