आता मोकाट गुरांची होणार गोशाळेत रवानगी..!

Bicholim : डिचोली शहरातील मोकाट गुरांची होणार धरपकड,सोमवारपासून मोहीम #GoaNews
आता मोकाट गुरांची होणार गोशाळेत रवानगी..!
BicholimDainik Gomantak

डिचोली: डिचोली शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या गुरांविरोधात पुन्हा मोहीम हाती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार शहरात मोकाटपणे फिरणाऱ्या गुरांची आता धरपकड होणार आहे. येत्या सोमवारपासून (ता. 22) गुरांना पकडण्याची मोहीम पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. या गुरांना पकडून त्यांची सिकेरी-पैरा येथील गोशाळेत रावानगी करण्यात येणार आहे. अशी माहिती पालिकेतून उपलब्ध झाली आहे.

Bicholim
आप नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश..!

गोमंतक गोसेवक महासंघाशी करार केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 218 गुरांना पकडून त्यांची रवानगी सिकेरी येथील गोशाळेत करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून गुरांना पकडण्याच्या मोहिमेला 'ब्रेक' लागला आहे. डिचोली शहरात मोकाट गुरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. शहरात विविध ठिकाणी ही गुरे रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. काही गुरे तर चक्क बाजारात बेधडकपणे फिरत असतात. व्यापारी तसेच ग्राहकांनाही या गुरांच्या उपद्रवास सामोरे जावे लागत आहे.

Bicholim
'काँग्रेस मेळाव्यादरम्यान वीज पुरवठा खंडित करण्याचा अयशस्वी प्रयत्न'

बाजारात हिंडणारी काही गुरे ग्राहकांवर हल्लेही करतात या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी व्यापारी आणि ग्राहकांकडून होत आहे.

सोमवारपासून धरपकड

गेल्या दोन महिन्यांपासून गुरे पकडण्याच्या मोहिमेला 'ब्रेक' लागला आहे. आता पुन्हा गुरांना पकडण्याची मोहीम हाती घेण्याचे पालिकेने ठरविले आहे. गुरांचा ज्यास्त करून संचार कोठे असतो. त्याची अगोदर पाहणी करण्यात येणार आहे. सोमवारपासून गुरांना पकडण्यात येणार आहेत.

-विजयकुमार नाटेकर, नगरसेवक, डिचोली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com