Polluted River Bicholim: डिचोली नदी कचरामय, मानवनिर्मित प्रदूषण चिंताजनक

सध्या नदीचे पाणी काळे झाल्याचे दिसून येतेय
Bicholim River
Bicholim RiverDainik Gomantak

Polluted River Bicholim: डिचोलीतून वाहणारी नदी दिवसेंदिवस प्रदूषणाच्या विळख्यात गटांगळ्या खात आहे. त्‍यामुळे या नदीच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या नदीचे पाणी काळे झाल्याचे दिसून येतेय.

डिचोली नदीचा उगम महाराष्ट्रातील तळेखोल गावात झालेला आहे. कुडचिरेहून ही नदी वाठादेव, डिचोलीतून पुढे मांडवी नदीला जाऊन मिळते.

कृषी आणि बागायती पिकांची गरज ओळखून कुडचिरे ते डिचोलीपर्यंत नदीवर विविध ठिकाणी बंधारे बांधलेले आहेत. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने गोव्यातील मांडवी, झुवारी, खांडेपार, साळ या नद्यांचा प्रदूषित नद्यांच्या यादीत समावेश केला आहे.

तर, गोवा विद्यापीठाच्या मरिन सायन्स विभागाच्या संशोधकांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या पाहणीत डिचोली नदी प्रदूषित असल्याचा अहवाल तयार केला आहे. पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.

दरम्‍यान, डिचोलीतील नदीत वाढणारे मानवनिर्मित प्रदूषण हा चिंतेचा विषय बनला आहे. नदीच्या अस्तित्वासाठी हे प्रदूषण रोखणे काळाची गरज आहे, असे मत निवृत्त प्राध्यापक विठ्ठल वेर्णेकर यांनी व्यक्त केले.

Bicholim River
Goa Corona Update : गोव्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ! केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिले 'हे' आदेश

ओंगळवाणे स्‍वरूप

डिचोली नदीत निर्माल्यासह प्लास्टिक आदी कचरा टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे. गावकरवाडा-डिचोली, वाठादेव, व्हावटी, कुडचिरेसह काही भागात नियमित कपडे धुण्याचे प्रकारही चालूच आहेत.

गोवा हागणदारीमुक्त राज्य असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असला तरी डिचोली नदीवर परप्रांतीयांकडून नैसर्गिक विधी उरकले जातात. काही भागात गुरांनाही धुण्यात येते तर काही भागात सांडपाणी नदीत सोडण्यात येत आहे. पावसाळ्यात तर गटारातील अस्वच्छता नदीत मिसळत असते.

Bicholim River
मानशी टिकविणे ही काळाची गरज

डिचोलीची जीवनरेषा असलेल्या डिचोली नदीचा समावेश प्रदूषित नद्यांच्या यादीत आहे. खाण व्यवसायामुळे या नदीत लोह, खनिजासह प्लास्टिक कचऱ्याची समस्या आहे. नदीत अस्वच्छतेचे प्रकारही वाढत आहेत. एकंदरीत ही अस्वच्छता म्हणजे नदीच्या अस्तित्वावर कोसळलेले मोठे संकट आहे.

- प्रा. राजेंद्र केरकर, (पर्यावरण अभ्यासक)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com