डिचोली: 'टिका उत्सव -3' ला तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद  

dicholi 2.jpg
dicholi 2.jpg

डिचोली: 'टिका उत्सव -3' ला शनिवारीही उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. चार केंद्रातून मिळून 936 जणांनी  'कोविड' (Covid19) प्रतिबंधात्मक लस घेतली. मागील सात दिवसांतील आजचा आकडा उच्चांकी आहे. आजही तरुण वर्गासह अनेकांनी  लसीकरणाला (vaccination) प्रतिसाद दिला. डिचोली मतदारसंघातील मुळगाव (Mulgaon) आणि साखळी मतदारसंघातील हरवळे येथील केंद्रावर तर  तरुणाईकडून अफाट  प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत सात  दिवसात मिळून तरुणाईसह   तालुक्यात 5 हजार 302 जणांनी लस घेतली आहे. (Bicholim Spontaneous response from youth to Tika Utsav 3)

या 'टिका उत्सव-3'अंतर्गत 18 आणि त्यावरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. शनिवारी मुळगाव पंचायत विभागात-286, चोडण पंचायत विभागात-187, कुडणे पंचायत विभागात- 184 आणि हरवळे पंचायत विभागात-279 जणांनी लस घेतली. डिचोली (Dicholi) आणि सामाजिक आरोग्य केंद्र तसेच मये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com