डिचोली तालुका वाचनालय स्वतंत्र जागेच्या प्रतीक्षेत

Tukaram Sawant
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

डिचोली आणि आजूबाजूच्या वाचकांसाठी उपयुक्‍त आणि वरदान ठरलेले हे वाचनालय मागील दीड वर्षांपासून म्हणजेच २३ जानेवारी २०१९ या दिवसापासून पालिकेच्या सभागृहात भाड्याच्या जागेत कार्यरत आहे. १५ फेब्रुवारी १९८४ साली डिचोलीच्या सरकारी केंद्र शाळेत हे तालुका वाचनालय सुरू करण्यात आले होते.

डिचोली,  छत्तीस वर्षांचा इतिहास असलेले डिचोलीतील सरकारी तालुका वाचनालयासमोर स्वतंत्र जागेची समस्या असून, वाचनालयासमोरील स्वतंत्र जागेचा हा प्रश्‍न कधी सुटतो, त्याची वाचकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. डिचोली आणि आजूबाजूच्या वाचकांसाठी उपयुक्‍त आणि वरदान ठरलेले हे वाचनालय मागील दीड वर्षांपासून म्हणजेच २३ जानेवारी २०१९ या दिवसापासून पालिकेच्या सभागृहात भाड्याच्या जागेत कार्यरत आहे. १५ फेब्रुवारी १९८४ साली डिचोलीच्या सरकारी केंद्र शाळेत हे तालुका वाचनालय सुरू करण्यात आले होते. नवीन प्रकल्प बांधकामासाठी दीड वर्षापूर्वी केंद्र शाळेची जुनी इमारत मोडल्यानंतर तालुका वाचनालयासमोर जागेचा प्रश्‍न निर्माण झाला. वाचनालयासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू झाला. आणि अखेर स्थानिक आमदार राजेश पाटणेकर यांच्या पुढाकारातून आणि पालिकेच्या सहकार्याने पालिका सभागृहात जागेची व्यवस्था झाली. आणि अखेर मागील वर्षी जानेवारी महिन्यात पालिका इमारतीतील सभागृहात हे वाचनालय स्थलांतरित करण्यात आले आहे.
या वाचनालयात कथा, कादंबरी, नाटक, कवितासंग्रह, विज्ञान, सामान्यज्ञान आदी मिळून २३ हजाराहून अधिक पुस्तके आहेत. सभासदांचा आकडाही दोन हजार आठशे तीन एवढा आहे. या वाचनालयात वाचनासाठी येणाऱ्या वाचकांचा आकडाही समाधानकारक आहे. सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे या वाचकांच्या उपस्थितीवर निर्बंध आले आहेत. अन्यथा विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसह पन्नासहून अधिक वाचक नियमितपणे वर्तमानपत्रे वाचण्यासाठी वाचनालयात येतात. त्याशिवाय पुस्तके नेण्यासाठी वा परत करण्यासाठी सभासद वाचक वाचनालयात येत असतात. नोकरी वा अन्य कारणामुळे शहराबाहेर असणाऱ्या वाचक आणि सभासदांची अन्य दिवशी होणारी गैरसोय लक्षात घेऊन हे वाचनालय रविवारी खुले निर्णय घेताना, मागील वर्षी ऑक्‍टोबर महिन्यापासून या अंमलबजावणी झाली आहे. आठवड्यातील सोमवार ते शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत तर शनिवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत या वेळेत हे वाचनालय खुले असते. आता रविवारीही सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत हे वाचनालय खुले ठेवण्यात येत आहे. सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे रविवारी वाचनालय खुले ठेवण्यावर मर्यादा आल्या आहेत.

संबंधित बातम्या