डिचोलीत होणार अत्याधुनिक बसस्थानक

25 वर्षांपूर्वी उभारलेल्या डिचोलीतील सध्याच्या कदंब बसस्थानकाची दूरवस्था झाली आहे.
डिचोलीत होणार अत्याधुनिक बसस्थानक
Bicholim will have Sophisticated bus stand Dainik Gomantak

डिचोली: पायाभरणी केल्यानंतर अडीच वर्षांहून अधिक काळ दुर्लक्षित राहिलेल्या डिचोलीतील (Bicholim) नियोजित बसस्थानक (Bus Stop) प्रकल्पाला आता लवकरच चालना मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गोवा (Goa) राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने 17 कोटी रुपये खर्चाची निविदा मंजूर करताना फोंडा (Ponda) येथील शिवम इन्फ्राटेक कंपनीला (Shivam Infratech Company) नियोजित बसस्थानक प्रकल्पाच्या बांधकामाचे कंत्राट दिले आहे. पावसाळ्यानंतर बसस्थानकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होण्याचे संकेत मिळाले आहेत.

अत्याधुनिक बसस्थानक

25 वर्षांपूर्वी उभारलेल्या डिचोलीतील सध्याच्या कदंब बसस्थानकाची दूरवस्था झाली आहे. बसस्थानक दिवसेंदिवस कमकुवत होत चालले आहे. तीन वर्षांपूर्वी या बसस्थानकाच्या स्लॅबचे तुकडे पडल्याने राज्याबाहेरील एका गर्भवती महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला होता. या घटनेनंतर बसस्थानकाच्या छपराची तात्पुरती दुरुस्तीही करण्यात आली. मात्र नवीन बसस्थानकाचा प्रस्ताव अडकून पडला होता, सध्याच्या बसस्थानकाच्या जागेत अत्याधुनिक प्रकल्प उभारण्याच्या सरकारचा प्रस्ताव आहे.

Bicholim will have Sophisticated bus stand
Goa: चिखली चौकात वाहतुकीला त्रास

मागील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच 8 जानेवारी 2019 रोजी अत्याधुनिक बसस्थानकाच्या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सरकारकडून आश्वासना व्यतिरिक्त आजपर्यंत बसस्थानकाच्या कामाला पुढील चालना मिळाली नव्हती. आता बसस्थानकाच्या कामाची निविदा मंजूर झाल्याने बसस्थानकाच्या कामाला चालना मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून, प्रत्यक्ष कामाला सुरवात कधी होते, ते पहावे लागणार आहे.

Bicholim will have Sophisticated bus stand
Goa: रेतीतून प्लास्टिक वेगळे करणारे यंत्र विकसीत

पावसाळ्यानंतर चालना

"शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बसस्थानकाच्या कामाची निविदा मंजूर झाली आहे. 17 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर काम हाती घेण्यात येईल."

-राजेश पाटणेकर, सभापती

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com