मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा; राज्यात दोन ऑक्सिजन प्लांटस उभारणार 

दैनिक गोमंतक
रविवार, 25 एप्रिल 2021

राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant)यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. 'येत्या 15 दिवसांत राज्यात दोन ऑक्सिजन प्लांटस उभारले जातील. त्यातील 1 प्लांट गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आणि दूसरा पोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारला जाईल.

पणजी : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant)यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. 'येत्या 15 दिवसांत राज्यात दोन ऑक्सिजन प्लांटस उभारले जातील. त्यातील 1 प्लांट गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आणि दूसरा पोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारला जाईल. तसेच, 1 मे पर्यंत बांबोलिम येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कोविड रुग्णालयात  रूपांतर केले जाईल,' अशी घोषणा प्रमोद सावंत यांनी केली आहे.   पंतप्रधान कॅरस फंड अंतर्गत पंतप्रधानांनी गोव्यात दोन ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. राज्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आम्ही काळजी घेत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शनिवारी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात ते बोलत होते.  (Big announcement by CM; Two oxygen plants will be set up in the state) 

गोव्यातील प्रसिद्ध म्हार्दोळ मंदिरात प्रवेश बंदी
 
कोरोनातून बरे झालेल्यांनी प्लाझ्मा दान करण्यास पुढे या  
यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनातून  बरे झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्यासाठी आव्हान केले. तसेच,  प्लाझ्मा दान करणाऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली.  त्याचबरोबर, डॉक्टरांशी बैठकीनंतर कोविड-19 व्यवस्थापनासाठी नवीन उपचार प्रोटोकॉल निश्चित करण्यात आला आहे आणि तो इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गोवा डॉक्टरांपर्यंत पोहोचविला जाईल.  तसेच, पोंडा येथील उपजिल्हा रुग्णालय, दोन्ही जिल्हा रूग्णालये  आणि गोवा मेडिकल कॉलेज याठिकाणी कोरोना रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. राज्यातील सर्व लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, चाचणीपासून रुग्णालयात दाखल होईपर्यंत सर्व सुविधा सरकारकडे उपलब्ध आहेत, त्यामूळे गोमंतकीयांनी लवकरात लवकर कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले आहे.  त्याचबरोबर राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे, त्यामुळे कोणीही त्यांच्याशी उद्धटपणे वागू नये,  अशी संकट ताकीदही त्यांनी दिली आहे. 

गोवेकरांनो आपल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी या नंबर वर संपर्क करा

लक्षणे आढळल्यास लगेच रुग्णालयात भरती व्हा 
धक्कादायक बाब म्हणजे, रुग्णालयात दररोज तीन त चार मृत रुग्णांना आणले जात आहे तर भरती झाल्यानंतर 24 तासात काही रुग्णांचा मृत्यू होत आहे. हे सर्व, रुग्णाला रुग्णालायत उशिरा दाखल केल्यामुळे होत आहे. त्यामुळे लक्षणे आढळताच रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे, अशी विनंती प्रमोद सावंत यांनी केली आहे. कोरोना हा संपूर्ण देशभरात वेगाने पसरला आहे, मात्र लॉकडाऊन हा त्यासाठी पर्याय नाही.  विरोधी पक्षांच्या आमदारांसह बरेच लोक सरकारवर टीका  करतात. पण टीका करण्याऐवजी त्यांनी सूचना द्याव्यात. आम्ही त्यांच्या सूचनांचे स्वागत करतो, असेही प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं. 

अर्थव्यवस्था सुरूच राहणार 
दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी काही काळ राहणार आहे. मात्र  गेल्या लॉकडाऊन मुळे राज्याला  प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते,  अनेकांनी नोकऱ्या गामावल्या होत्या. त्यामुळे यावेळी राज्याच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान  नये यासाठी राज्यातील सर्व उद्योगधंदे सुरू ठेवले जाणार आहे.  पर्यटन उद्योग, औषधी उद्योगही चालूच राहणार आहेत. असेही प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच, राज्यात आतापर्यंत 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या केवळ 50 टक्के लोकांनी ही लस घेतली आहे. येत्या 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील सर्वांसाठी लसीकरून सुरू होणार आहे. त्यामुळे आता सर्वआणि लसीकरण करून घ्यावे, मात्र जे इतर गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत त्यांनी लसीकरण करण्यापूर्वी एकदा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा,  असे आवाहनही प्रमोद सावंत यांनी केले आहे. 

संबंधित बातम्या