दहावी-बारावी बोर्ड परीक्षांबाबत गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय 

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

गोव्यातील कोरोना साथीची परिस्थिती पाहता गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (जीबीएसएचएसई) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पणजी : गोव्यातील कोरोना साथीची परिस्थिती पाहता गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (जीबीएसएचएसई) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 2020-21 वेळापत्रकानुसार घेण्यात येणार असल्याची घोषणा गोवा शिक्षण मंडळाने केली आहे.  जीबीएसएचएसईने जाहीर केलेल्या तारखांनुसार उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एचएसएससी) बोर्डाची परीक्षा 24 एप्रिल ते 17 मे दरम्यान घेण्यात येईल, तर माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा 19 मे ते 2 जून या कालावधीत घेण्यात येणार आहे.

गोव्यात लागणार लॉकडाऊन? मुख्यमंत्री म्हणाले..

जीबीएसएचएसईचे अध्यक्ष भागीरथ शेट्टी यांनी दहावी बारावी परीक्षांबाबत माहिती दिली. बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झालेला नसून त्या ठरलेल्या वेळापत्रकांप्रमाणेच  घेण्यात येणार आहेत. दहावी बारावी परीक्षा 18  केंद्रे आणि जवळपास 90 विषम उपकेंद्रांवर ऑफलाइन परीक्षा घेण्यात येतील, असे शेट्टी यांनी सांगितले आहे. तसेच परीक्षेदरम्यान,  मास्क लावणे,  शारीरिक अंतर राखणे,  वर्ग व केंद्रे स्वच्छ करणे, विशेष वैद्यकीय पथक, कंटेन्ट झोनमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतूद या काही बाबी परीक्षेच्या वेळी पाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 

रस्त्यांवरील अपघातात जाणाऱ्या बळींची भाजप सरकार जबाबदारी घेणार का? दिगंबर ...

तसेच, प्रत्येक वर्गात फक्त 12 ते 15 विद्यार्थ्यांची योग्य शारीरिक अंतर राखून बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीसाठी  जवळच्या आरोग्य केंद्रातील एक वैद्यकीय पथक किंवा अधिकारी परीक्षा केंद्रांवर उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे. तर ज्या विद्यार्थ्याच्या कुटुंबात कोविड -19 चा रुग्ण आहे, त्याला एकतर एका स्वतंत्र परीक्षा केंद्रामध्ये परीक्षा देण्याची मुभा दिली जाईल किंवा जूनच्या पूरक परीक्षेच्या वेळी परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. दरम्यान, यावर्षी राज्यभरातून तब्बल 19, 241 विद्यार्थी बारावीची तर 24,000 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. 
 

संबंधित बातम्या