स्वरोजगारातून सुरू केला जादूगाराने व्यवसाय

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

स्वरोजगारातून भवितव्य घडवणाऱ्या युवकांच्या हिमतीची दाद देणे आवश्‍यक असून जादुगार असूनही अक्षय प्रेमानंद पाटील यांनी व्यवसाय सुरू करून इतरांसमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उद्‌गार कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.

फोंडा: स्वरोजगारातून भवितव्य घडवणाऱ्या युवकांच्या हिमतीची दाद देणे आवश्‍यक असून जादुगार असूनही अक्षय प्रेमानंद पाटील यांनी व्यवसाय सुरू करून इतरांसमोर आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उद्‌गार कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी काढले.

बेतोडा येथे अक्षय पाटील यांच्या रॉयल गार्डन या आस्थापनाच्या उद्‌घाटनप्रसंगी गोविंद गावडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर फोंड्याचे आमदार रवी नाईक, शिरोड्याचे आमदार सुभाष शिरोडकर, अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर, कुर्टी पंच शर्मिला सांगावकर, उद्योजक राजेश वेरेकर, माजी सरपंच संदीप खांडेपारकर, उद्योजक अभय प्रभू, माजी नगरसेवक शिवानंद सावंत, जादुगार प्रेम आनंद, नीता पाटील आदी उपस्थित होत्या. 

गोविंद गावडे यांनी आजच्या घडीला नोकरीच्या मागे न धावता उद्योजकता विकास साधताना इतरांसाठी रोजगार निर्माण करण्याची धमक बाळगण्याची गरज व्यक्त केली. यावेळी जादुगार प्रेम आनंद यांच्या षष्ट्यब्दीनिमित्त प्रसिद्ध चित्रकार सीताराम घारे यांचा मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती श्री. घारे यांनी प्रेम आनंद यांना स्वहस्ते काढलेला फोटो भेट दिला. जादुगार अफसर यांनी प्रेम आनंद यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन मनोहर भिंगी यांनी केले तर रॉयल गार्डनचे व्यवस्थापक अक्षय पाटील यांनी आभार मानले. त्यानंतर नीतिन फडते व स्वप्निल पारकर यांचा काराओके कार्यक्रम झाला.

संबंधित बातम्या