मोठी बातमी....गोव्‍यात कोरोनाचे १६ रूग्‍ण

dainik gomantak
रविवार, 17 मे 2020

या १६ रूग्‍णांवर मडगाव येथील इएसआय रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. 

पणजी,  
‘ग्रीन झोन’मधून राज्य बाहेर पडण्याची भीती गोमंतकीयांत निर्माण झाली असून, आता ‘कोरोना’ विषाणूमुळे रुग्णांचा दुहेरी आकडा झाला आहे.  दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या नव्या रुग्णांमुळे राज्याची चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोव्‍यात कोरोनाग्रस्‍तांची संख्‍या १६ झाली असून लोकांमध्‍ये भीतीचे प्रमाण वाढते आहे.
शनिवारी पाच नवे ‘कोरोना’चे रुग्ण सापडल्यामुळे ही भीती आणखीनच दाट होत होती. यातील दिल्‍ली येथून ट्रेनमधून आलेल्‍या तीन रूग्‍णांचा व्‍हायरॉलॉजी लॅबमधील रिपोर्ट आला असून हा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्‍ह आहे. या १६ रूग्‍णांवर मडगाव येथील इएसआय रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. 
शनिवारी सापडलेल्या पाच रुग्णांमध्ये कोलकता येथून परतलेले दोन गोमंतकीय, कळगुंट येथे विलीकृत असलेला एक युवक, एक कर्मचारी, तसेच सांगली येथील एका व्यक्तीचा समावेश आहे

संबंधित बातम्या