मोठी बातमी...गोव्‍यात कोरोना रुग्‍णसंख्‍या ३१ झाली.

dainik gomantak
सोमवार, 18 मे 2020

कोरोनाचा सामुदायिक प्रसार अद्याप तर राज्यात झालेला नाही आणि होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नरत असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

पणजी,

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३१ वर पोहचलेली आहे. शनिवारी हा आकडा १३ होता, रविवारी २२ झाला आणि आज सकाळपासून ३१ कोरोनग्रस्‍तांची संख्‍या झाली आहे. रविवारी सापडलेल्‍या नऊ जणांमधील ८ रुग्ण महाराष्ट्रातून रेल्वेने आलेले आहेत, तर एकजण कर्नाटकातून आलेला आहे. त्‍या सर्वजणांची प्रकृती स्थिर असून यांच्यावर मडगाव येथील ईएसआय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गोवा आरोग्य खात्याने दिली. आज सकाळी ज्‍या ९ रूग्‍णांची नोंद झाली आहे, ते रूग्‍णही मुंबई येथूनच आलेले असल्‍याची माहिती मिळाली आहे. 
दरम्‍यान, मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजित राणे यांनी लोकांनी घाबरून जाऊ नये. सापडलेले रुग्‍ण गोव्‍याबाहेरून आले होते. त्‍यांच्‍यावर उपचार सुरू आहेत. लोकांनी काळजी करू नये, सुरक्षेबाबत उपाययोजना करावी, असे आवाहन केले आहे.
भविष्यात रुग्णांची संख्या वाढलीच, तर कोव्हिड रुग्णालयात ६० व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच व्हिक्टर अपोलो रुग्णालयाचा वापरही करण्यात येणार आहे. सतर्कता आणि अधिक तयारीसाठी १०० ते १५० खाटांची व्यवस्था करण्याची तयारी आहे. चाचण्या सलग सुरू आहेत. कोरोनाचा सामुदायिक प्रसार अद्याप तर राज्यात झालेला नाही आणि होऊ नये म्हणून आम्ही प्रयत्नरत असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.
व्हायरॉलॉजी लॅबमध्ये दिवसाला दीड ते दोन हजार कोरोना पडताळणी चाचण्या व्हाव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी येथे योग्य पदवी असणारे म्हणजे एमडी तसेच एमएससी शिक्षित मायक्रोबायोलॉजिस्ट भरती करण्यात येणार आहेत. आमची टीम पूर्णपणे झोकून काम करीत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. 

संबंधित बातम्या