'प्रियोळकरांनी धरला जोर, गोविंद गावडे वन्स मोअर'

प्रियोळमध्ये गोविंद गावडे समर्थकांची पोस्टरबाजी
Govind Gaude Posters

Govind Gaude Posters

Dainik Gomantak

पणजी : भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी अपक्ष आमदार गोविंद गावडेंना (Govind Gaude) प्रियोळ मतदारसंघातून उमेदवारी देण्याची घोषणा केली. यानंतर प्रियोळ मतदारसंघात गावडे समर्थकांनी ठिकठिकाणी पोस्टरबाजी सुरु केली आहे. 'प्रियोळकरांनी धरला जोर, गोविंद गावडे वन्स मोअर', अशा आशयाची पोस्टरबाजी प्रियोळच्या चौकाचौकात करण्यात आल्याचं चित्र आहे.

<div class="paragraphs"><p>Govind Gaude Posters</p></div>
भाजपशी कधीच गद्दारी करणार नाही

गोविंद गावडेंच्या उमेदवारीवरुन प्रियोळ मतदारसंघात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. एकीकडे गोविंद गावडेंनी कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं म्हटलं आहे, तर प्रियोळमधील भाजप कार्यकर्त्यांनी मात्र गावडेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे. मात्र असं असलं तरीही गोविंद गावडेंनीही महालसेचं दर्शन घेत रविवारपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी निवडणुकीपूर्वी (Election) सभांचं आणि बैठकांचं आयोजन केलं जात आहे.

<div class="paragraphs"><p>Govind Gaude Posters</p></div>
ॲन्थोनी बार्बोजाला भाजपतर्फे उमेदवारीची शक्यता!

दरम्यान गोविंद गावडेंना उमेदवारी दिल्याच्या परिस्थितीत कोणी पक्षविरोधी बंड केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रियोळ भाजप (BJP) मंडळ पक्षाच्या निर्णयाविरोधात जाणार नाही, असेही भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी स्पष्ट केले आहे. मात्र असं असलं तरीही गावडेंच्या उमेदवारीला आतापासूनच विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. गोव्यात सध्या फोडाफोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. त्यातच ज्या नेत्यांचे त्यांच्या मतदारसंघात प्राबल्य आहे, अशांना आपल्या पक्षात घेण्यासाठी रस्सीखेचही सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com