मुख्यमंत्र्यांवरील ध्वनिफीतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद...

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या लोहमार्गाच्या शेजारी राहण्यास यावे, असे आवाहन करणारी ध्वनिफीत आम आदमी पक्षाने जारी केली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पणजी : लोहमार्गाच्या दुपदरीकरणाचे समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या लोहमार्गाच्या शेजारी राहण्यास यावे, असे आवाहन करणारी ध्वनिफीत आम आदमी पक्षाने जारी केली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते सुरेल तिळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले, की एका मिनिटभराच्या या ध्वनीफितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी लोहमार्गाशेजारी राहण्यासाठी आम आदमी पक्ष जागा उपलब्ध करून देईल असे नमूद केले आहे. या ध्वनिफीतीचे स्वागत राज्यभरात झाले. अनेकांनी मुख्यमंत्री जर लोहमार्गाच्या शेजारी राहण्यास तयार नसतील तर मग अनेकांचे आयुष्य लोहमार्गाच्या रुंदीकरणातून धोक्यात घालण्याचा अधिकार काय अशी विचारणा केली आहे. हा विषय ध्वनीफितीच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोचला आहे.

राज्यातील लोकांशी चर्चा अथवा सल्लामसलत न करता हा जो निर्णय घेण्यात आला त्याच्या प्रक्रियेविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते म्हणाले, लोहमार्ग दुपदरीकरणातून गोवा राज्य किंवा गोमंतकीय जनतेला कोणता फायदा आहे. हा प्रकल्प केवळ कोळसा हाताळणी करणाऱ्या कंपन्यांना मदत करण्यासाठी आहे.

संबंधित बातम्या