Goa Sport Authority Scam : गोवा क्रीडा प्राधिकरणामध्ये कोट्यावधींचा घोटाळा; विकास भगत यांचा आरोप

दक्षता खात्याकडे निवेदनाद्वारे चौकशीची मागणी
Vikas Bhagat
Vikas BhagatDainik Gomantak

गोव्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा जागतिक चषक २०२२ स्पर्धेवेळी इव्हेंट मॅनेंजमेंटच्या नावाखाली गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाकडून कोट्यावधींचा गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार गोवा फॉरवर्डचे विकास भगत यांनी आज दक्षता खात्याकडे दाखल केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून घोटाळ्यात गुंतलेल्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दक्षता संचालकांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती विकास भगत यांनी दिली.

Vikas Bhagat
Calangute : अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय इतर बेकायदेशीर कृत्यांविरोधात कळंगुट ग्रामस्थ एकवटले; 8 जानेवारीला मुक मोर्चा

१७ वर्षांखालील महिला फिफा जागतिक चषक स्पर्धेसाठी राजश्री क्रिएशन्स यांची इव्हेंट मॅनेजमेंट म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या इव्हेंट मॅनेजमेंटतर्फे राज्यभर या स्पर्धेसंदर्भात त्यांनी केलेल्या कामाची बनावट बिले प्राधिकरणाकडे सादर करून लुटमार चालविली आहे. काही न केलेल्या कामांची बिले सादर केल्याने त्याला प्राधिकरणाच्या माजी संचालकांनी संमती देण्यास नकार दिला होता. त्यामुळे क्रीडामंत्र्यांनी त्यांची तेथून उचलबांगडी करून त्यांच्याजागी त्यांच्याच नातेवाईकाला या पदावर विराजमान केले आहे.

तसेच निवृत्त झालेले अधिकारी रंगाराजू यांची कंत्राटी पद्धतीवर अधीक्षक अभियंता म्हणून नियुक्ती केली आहे. हे पद भरण्यासाठी संमती नाही व रिक्त असलेले मुख्य अभियंता पद अजूनही भरण्यात आलेले नाही. रंगाराजू यांनी जे कारनामे जलसंपदा खात्यामध्ये केले तेच करण्यासाठी त्यांना आता या प्राधिकरणात आणण्यात आले आहे. या एकूण गैरव्यवहारात तसेच हेराफेरीमध्ये संबंधित मंत्र्यांपासून ते अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप भगत यांनी केला.

Vikas Bhagat
Gauri Dhavalikar : थेट इंडिगोची पायलट बनली; गोमंतकन्येची गगनभरारी

इव्हेंट मॅनेटमेंटने केलेली कामे कमी दर्जाची असल्याने या बिलांना मंजुरी देण्यात आली नाही. गोवा फॉरवर्डने माहिती हक्क कायद्याखाली यास्पर्धेसाठी उभारण्यात आलेल्या साधनसुविधांची तसेच इव्हेंट मॅनेटमेंटने केलेल्या कामाची माहिती मागवण्यात आली होती. या प्राधिकरणाने इव्हेंट मॅनेटमेंटची माहिती वगळून इतर सर्व माहिती या कायद्याखाली दिली. यावरून प्राधिकरणाच्या तांत्रिक विभागाकडून इव्हेट मॅनेटमेंटच्या बिलामध्ये हेराफेरी करण्याचा प्रयत्न रंगराजू करत आहेत. मे. व्हाईझक्स सोल्युशन्स लि. कंपनीने या स्पर्धेसाठी निर्मित केलेल्या लोगोसाठी ३५ लाखांचे बिल तपासणी वा शहानिशा न करता ते मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे भगत यांनी सांगितले.

करदात्यांच्या पैशांचा विनियोग लुटमार करण्यासाठी केला जात आहे. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे व हल्लीच ४०० कोटी रुपये कर्ज काढून सरकारने ही बिले मंजूर करण्यास सुरू केले आहे. त्यामुळे दक्षता खात्याने या प्रकऱणाची चौकशी करताना प्राधिकरणाने फिफा जागतिक चषक स्पर्धा आयोजित करण्यासाठी ज्या प्रक्रिया केल्या आहेत त्यांच्या फाईल्स मागवून चौकशी करावी अशी मागणी भगत यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com