Bike rally: महिला दिनानिमित्त दुचाकी रॅली

दिव्या राणे यांचा सहभाग : ‘फिनिक्स वुमन विंग’तर्फे वाळपईमध्ये परेड
Bike rally
Bike rallyDainik Gomantak

आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून त्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे. राजकारण असो वा सामाजिक क्षेत्र, महिला पुढे येत आहेत. येणारे जग हे महिलांचेच असेल, असे प्रतिपादन पर्येच्या आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी केले.

रविवारी संध्याकाळी ‘वाळपई फिनिक्स वुमन विंग’तर्फे महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास आयोजित केलेल्या दुचाकी परेडच्या उदघाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन व झेंडा फडकावून परेडला सुरुवात करण्यात आली. यावेळी वाळपई मामलेदार कार्यालयाकडून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमाला वाळपईच्या नगराध्यक्ष शेहजीन शेख, नगरगावच्या जिल्हा पंचायत सदस्य राजश्री काळे, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, नगरसेवक रामदास शिरोडकर, प्रसन्ना गावस, फिनिक्स वुमन विंगच्या अध्यक्ष सुनैजा शेख, अब्दुल्ला खान तसेच इतरांची उपस्थिती होती.

Bike rally
Goa Sport News: क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडणे नुकसानकारक- अनुराग ठाकूर

100 महिलांना हेल्मेट भेट

या रॅलीत महिलांनी खासकरून गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले होते. यावेळी महिलांना शुभेच्छा देण्यासाठी पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. ही रॅली वाळपई मामलेदार कार्यालयाकडून सुरू होऊन नाणूस येथून परत सय्यदनगर येथे तिची सांगता झाली. सुमारे 350 महिलांनी या रॅलीत भाग घेतला. रॅलीसाठी प्रथम आलेल्या 100 महिलांना हेल्मेट भेट देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com