Motocross Race: सुपरक्रॉस ॲक्शन चॅम्पियनशीप स्पर्धेत मडगावच्या युवकाचा मृत्यू

रेस ट्रॅकवर दुचाकी जम्प करताना घडला अपघात
Mapusa
MapusaDainik Gomantak

म्हापसा येथे आज सुपरक्रॉस ॲक्शन चॅम्पियनशीपचे आयोजन केले होते. ही स्पर्धा म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिराच्याविरुद्ध दिशेला शेतात आयोजित केली होती. या स्पर्धेत प्रात्यक्षिक करताना झालेल्या अपघातात एका मोटरसायकल स्वार स्पर्धकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अल्ताबआलम हसन लाडजी ( 20, घोगळ-मडगाव ) असे या मृत युवकाचे नाव आहे.

(biker Aftab Shaikh dies after he lost balance during an ongoing motocross race in Mapusa)

म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (ता.13) सकाळी 11.30 च्या सुमारास घडली आहे. मृत पावलेला अल्ताबआलम हा आपली (जीए 03 क्यू 8578) मोटरसायकल घेऊन मातीच्या सहाय्याने बनविलेल्या रेस ट्रॅकवर दुचाकी जम्प करुन कसरत करताना हा अपघात घडला आहे.

Mapusa
Vasco: बेवारस वाहनांवर कारवाई सुरु; नियमांचे उल्लंघन मात्र थांबेना

सुपरक्रॉस स्पर्धेनिमित्त कृत्रिमरित्या बनवलेल्या या रेस ट्रॅकवर ही स्पर्धा सकाळी सुरु होती. यावेळी ट्रॅकवर जम्प मारल्यानंतर मयत अल्ताबआलमच्या मोटरसायकलचा तोल गेल्याने ती रेस ट्रॅकच्या बाहेर गेली व तो दुचाकीसह रेस ट्रॅकच्या बाजूला खाली जमिनीवर कोसळला.

Mapusa
Goa Agriculture: शेतकऱ्यांना स्वयंभू बनविण्यासाठी युवकांनी पुढे यावे- रमेश तवडकर

यावेळी मयत अल्ताबआलम याच्या मानेला तसेच छातीजवळ दुखापत झाली. त्यास तातडीने रुग्णवाहिकेतून आधी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर, पुढील उपचारासाठी त्यास गोमेकॉत हलविले. तिथे उपचार सुरु असताना अल्ताब आलमचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा पंचनामा हा पोलीस हवालदार उमेश नाईक यांनी केला, तर पुढील तपास हा महिला पोलीस उपनिरीक्षक रिचा भोंसले या करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com