मडगाव पालिकेत कामगारांना गणवेश बंधनकारक

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

काही दिवसांपूर्वी पालिका मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी ज्या कामगारांना गणवेश भत्ता दिला जातो, त्यांनी पालिकेत कामावर येताना गणवेश घालून येणे बंधनकारक करण्यात आले होते.

 नावेली : मडगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी पालिकेतील कामगारांनी पालिकेत कामावर येताना गणवेश घालून कामावर येण्यास बंधनकारक केल्याने व गणवेश घालून न येणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने ९५ टक्के कामगार गणवेश घालून पालिकेत कामावर येत असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी पालिका मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी ज्या कामगारांना गणवेश भत्ता दिला जातो, त्यांनी पालिकेत कामावर येताना गणवेश घालून येणे बंधनकारक करण्यात आले होते.

हाफ पॅन्ट गणवेश परिधान करणाऱ्यांना वर्षाला ४५०० रुपये तर फुल पॅन्ट परिधान करणाऱ्या कामगारांना ५००० रुपये तसेच धुलाई भत्ता दर महिन्याला ७५० रुपये दिला जातो. परंतु अनेक कामगार पालिकेत कामावर येताना गणवेश परिधान करून कामावर येत नसल्याचे पालिका मुख्याधिकारी फर्नाडीस यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी पालिकेत कामावर येताना गणवेश घालून कामावर येण्यास बंधनकारक केल्याने आता सुमारे ९५ कामगार गणवेश घालून पालिकेत कामावर येत असल्याची माहिती फर्नांडिस यांनी दिली.

पालिका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कामगार पालिकेत गणवेश घालून येत नसल्याने ते कामावर आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. अनेकजण काम न करता पालिका इमारतीच्या आवारात फिरताना दिसतात. तर काहीजण गप्पा मारताना दिसतात. आता पालिका मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी गणवेश बंधनकारक केल्याने अनेक जण काम करताना दृष्टीस पडतात.

संबंधित बातम्या