बायोमेट्रिक मशीनमुळे त्या कार्यालयातील १३ जणांना झाला कोरोना संसर्ग

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

म्हापसा येथील उत्तर गोवा उपशिक्षणाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून श्रीहरी सातार्डेकर (५९) यांचे कोविडमुळे निधन झाले. ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. बायोमेट्रिक मशीनमुळे त्या कार्यालयातील १३ जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

म्हापसा: म्हापसा येथील उत्तर गोवा उपशिक्षणाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून श्रीहरी सातार्डेकर (५९) यांचे कोविडमुळे निधन झाले. ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथील सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. बायोमेट्रिक मशीनमुळे त्या कार्यालयातील १३ जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी घेण्याची सेवा खंडित केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर १ नोव्‍हेंबरपासून हे मशीन वापरण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार उत्तर गोवा उपशिक्षणाधिकारी कार्यालयाने या मशीनचा वापर सुरू केला होता. एक महिला कर्मचारी १२ नोव्‍हेंबर रोजी बाधित मिळाली होती. तिने त्या मशीनचा वापर केला होता. त्यानंतर अन्य १२ जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात सातार्डेकर यांचाही समावेश होता.

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते कुटुंबीयांसह सावंतवाडी येथे मूळ गावी गेले होते. तेथे त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले होते. बुधवारी दुपारी उपचार सुरू असताना सातर्डेकर यांचे निधन झाले. सातार्डेकर तीन-चार महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पत्नी म्हापशातील विद्यालयात शिक्षिका आहेत.

आणखी वाचा:

 

संबंधित बातम्या