बर्ड फ्लू अपडेट : गोव्यात शेजारील राज्यांमधून कोंबड्या येणार नाही

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 12 जानेवारी 2021

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने शेजारील राज्यांतून कोंबड्या आणण्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे.

पणजी  : महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने शेजारील राज्यांतून कोंबड्या आणण्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत हा आदेश जारी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी घेतली. अद्याप बर्ड फ्लूची लागण झाल्याची एकही घटना राज्यात अद्याप उघडकीस आलेली नाही. यामुळे राज्यात चिकनचे दर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात महाराष्ट्र व कर्नाटकातून दररोज कोंबड्या आणल्या जातात. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांसाठीही चिकनची मोठी मागणी असते. मध्यंतरी बीफचा विषयदेखील गाजला होता.

महाराष्टेरातील परभणीच्या मुरुंबा इथं बर्ड फ्लूमुळे 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भिताचं वातावरण असून पाटबंधारे विभाग ग्रामपंचायत, वन विभाग, पातळींवर काळजी घेण्याचे आदेशही दिले आहेत.

संबंधित बातम्या