Tourist Issues on Arashi Beach : पर्यटकांचा हुल्लडपणा थांबेना; आरोसी किनाऱ्यावर चारचाकीने पक्ष्यांना चिरडले

स्थानिकांकडून कारवाईची मागणी
Goa Tourist
Goa TouristDainik Gomnatak

आरोसी समुद्रकिनाऱ्यावर बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या पर्यटकांमुळे दोन समुद्री गुलांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. यावेळी उपस्थित स्थानिकांनी पर्यकांना याचा जाब विचारत पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे संबंधित चालक पर्यटकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

(Birds crushed by four-wheelers on Arashi Beach Goa)

Goa Tourist
Goa Police Controversy : वादग्रस्त पोलीस अधिकारी एकोस्कर यांच्या विरोधातील तक्रार आता महासंचालकांच्या कोर्टात

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या दरम्यान आरोसी समुद्रकिनाऱ्यावर एका पर्यटकांने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे वाहन चालवत समुद्री पक्ष्यांच्या अंगावर चारचाकी घातल्याने (दोन समुद्री गुलं ) दोन समुद्री पक्षांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित पर्यटकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत व 184 वाहन कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एक चारचाकी (xuv) क्रमांक टीएस 12 ईटी 3333 हे वाहन समुद्रकिनाऱ्यावर वाहन घेणे गुन्हा असताना आरोसी समुद्रकिनाऱ्यावर आणले व यावेळी चारचाकी थेट सीगुल पक्ष्यांच्या कळपावर घातली. यात दोन सी गुल पक्षांचा मृत्यू झाला. घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्या पर्यटकांसह स्थानिकांना याचा धक्का बसला.

Goa Tourist
Accident In Farmagudi: फार्मगुडी येथे कंटेनरला अपघात! बायपास रोडवरील तीक्ष्ण वळणे म्हणजे मृत्यूचा सापळा

या घटनेत सहभागी असलेल्या दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आल्यानंतर सदर प्रकरण वेर्णा पोलिस स्थानकात पोचले.पोलिसांनी वाहन चालवणाऱ्या चालक पर्यटकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. वेर्णा पोलिस निरीक्षक डायगो ग्रेसियस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com