Goa BJP 2nd Candidate List: 'भाजप'तर्फे दुसरी उमेदवार यादी जाहीर

भारतीय जनता पार्टीतर्फे आज दुसरी उमेदवार यादी जाहीर; यादीत एकूण 6 जणांचा समावेश
Goa BJP 2nd Candidate List
Goa BJP 2nd Candidate ListDainik Gomantak

Goa BJP 2nd Candidate List: काही दिवसांपूर्वी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. यामध्ये 40 मतदारसंघांपैकी 34 मतदारसंघांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी त्या यादीने गोव्याच्या राजकारणात अत्यंत खळबळ माजवली होती. (BJP announces second list of candidates)

Goa BJP 2nd Candidate List
पार्सेकर यांच्या 'घरवापसी'साठी भाजप नेते प्रयत्नशील: प्रमोद सावंत

उमेदवारी न मिळाल्याने काही नेत्यांनी नाराज होऊन पक्षाला रामराम ठोकला होता. यामध्ये प्रामुख्याने माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) आणि उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचा समावेश होतो. ही प्रकरणे राजकीय वर्तुळात चांगलीच गाजली होती. 34 उमेदवारांची भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर उरलेल्या 6 जागांसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. अखेर आज भाजपतर्फे (BJP) दुसरी उमेदवार यादी (Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 6 जणांचा समावेश आहे.

  • राजेश पाटणेकर (डिचोली)

  • जोसेफ सिक्वेरा (कळंगुट)

  • अंतानियो फर्नांडिस (सांताक्रुझ)

  • जेनिता पांडुरंग मडकईकर (कुंभारजुवे)

  • नारायण नाईक (कुठ्ठाळी)

  • अँथनी बारबोसा (कुडतरी)

Goa BJP 2nd Candidate List
Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये झळकला गोव्याचा वारसा

कुंभारजुवेमधून श्रीपाद नाईक यांचा मुलगा सिद्धेश नाईक यांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चा सुरू होत्या. पण त्याऐवजी विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या पत्नी जेनिता पांडुरंग मडकईकर यांना झुकते माप देण्यात आले आहे. आता सिद्धेश नाईक यांची प्रतिक्रिया काय असणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. शिवाय भाजप पहिल्यांदाच 40 पैकी 40 जागांवर ही विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) लढवत आहे. त्यामुळे ही निवडणूक नेमके कोणते वळण घेणार याची संगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com