‘काँग्रेस पक्षाने गोमंतकीयांची दिशाभूल करू नये’ : भाजपाच आरोप

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

सरकारने ही बिले फेडण्यासही तीन टप्प्याची मुभा दिलेली आहे. पण, कॉंग्रेस पक्ष वीज दरवाढ केल्याचा तथ्यहीन विधाने करून गोमंतकीयांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप दक्षिण गोवा भाजप पक्षाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

सासष्टी: राज्य सरकारने वीज बिलात वाढ केलेली नसून, टाळेबंदीपूर्वी असलेल्या वीज दरातच गोमंतकीयांना बिले देण्यात आली आहे. मात्र, तीन महिन्यांची वीज बिले एकत्र पाठविल्याने दरवाढ केल्याचे दिसून येत आहे. सरकारने ही बिले फेडण्यासही तीन टप्प्याची मुभा दिलेली आहे. पण, कॉंग्रेस पक्ष वीज दरवाढ केल्याचा तथ्यहीन विधाने करून गोमंतकीयांची दिशाभूल करीत आहे, असा आरोप दक्षिण गोवा भाजप पक्षाचे अध्यक्ष तुळशीदास नाईक यांनी आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

 

कोंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, महिला काँगेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजेच्या दरात वाढ केल्याचा दावा करुन सरकार विरोधात आंदोलन पुकारून निषेध केला. पण, वीज दरवाढी संबंधी काँग्रेस पक्षाच्या एकानेही मंत्री काब्राल यांच्याशी चर्चा केली नाही, अशी माहिती तुळशीदास नाईक यांनी दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या