उद्या भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांची बैठक; शपथविधीची तारीख होणार निश्चित

काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
Dr. Pramod Sawant
Dr. Pramod SawantTwitter/ANI

Goa CM Latest News: गोव्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज 10 दिवस झाले असूनही गोव्यामध्ये सरकार स्थापन झालेले नाही. भाजपच्या विजयानंतर मगोच्या पाठींब्‍यावरुन भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये प्रमोद सावंत यांच्याबरोबर विश्‍वजित राणेंचेही नाव घेतले जात होते. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंतच असणार अशी ग्वाही भाजपतर्फे देण्यात आली. असे असूनही भाजप अद्याप गोव्यात सत्ता स्थापन करू शकले नाही. या सगळ्या अंतर्गत वादामुळे भाजपमध्ये (BJP) एकसूत्रता आणि एकमत नसल्याचे समोर आले आहे. (BJP central observers meeting tomorrow; The date of swearing in will be fixed)

Dr. Pramod Sawant
Air Pollution : स्वच्छ हवा मिळणे हा मानवी हक्क : राज्य मानवी हक्क आयोग

भाजपच्या नेत्यांच्या एकमेकांसोबतच्या बैठका आणि चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या आहेत. काल काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि विश्‍वजित राणे (Vishwajit Rane) दिल्लीला रवाना झाले. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंह तोमर आणि एल मुरूगन हे उद्या गोव्यामध्ये दाखल होणार आहेत. उद्या संध्याकाळी भाजप विधिमंडळ गटाची बैठक होणार असून या बैठकीमधून गोव्यात भाजपची सत्ता कधी स्थापन होणार आणि शपथविधी कधी पार पडणार, याची माहिती मिळणार आहे.

सत्ता स्थापनेला झालेल्या विलंबामुळे काँग्रेस (Congress) आणि भाजपमधील हालचालींना वेग आला आहे. बहुमत मिळूनही सरकार बनले नसल्यामुळे गोव्यातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. आधीच निवडणुकीपूर्वी गाजलेल्या राजकारणामुळे गोवेकर संभ्रमात होते; त्यात आता या सरकार स्थापनेच्या विलंबामुळे पुन्हा गोवेकरांच्या संभ्रमात भर पडली आहे.

दरम्यान भाजपच्या या स्थितीवर काँग्रेसनेही निशाणा साधला होता. यावर पलटवार करत भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी काँग्रेसवर सणसणीत टीका केली. भाजपकडे लक्ष देण्यापेक्षा विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे काँग्रेसने लक्ष द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे नेते दिगंबर कामत यांच्यावरही टोला लगावला होता. दिगंबर कामत यांच्या भाजप नेत्यांसोबत वाढलेल्या बैठकीमुळे ते भाजपमध्ये दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत, असे मत मुल्ला यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगू लागल्या आहेत. आता उद्याच्या बैठकीनंतर गोव्याच्या राजकारणाला आणि सत्ता स्थापनेला नवी दिशा मिळणार आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com