समाजातील सगळ्या घटकांना एकत्र घेऊन जाणे हेच भाजपचे धोरण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

भारतीय जनता पक्ष कधीही जाती धर्मामध्ये भेदभाव करीत नाही. सर्व घटकांना एकत्र घेऊन जाणे हे पक्षाचे धोरण असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्याच दिशेने वाटचाल करीत असल्याचे फातोर्ड्याचे माजी आमदार तथा मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. 

मडगाव : भारतीय जनता पक्ष कधीही जाती धर्मामध्ये भेदभाव करीत नाही. सर्व घटकांना एकत्र घेऊन जाणे हे पक्षाचे धोरण असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांच्या नेतृत्वाखालील सरकार त्याच दिशेने वाटचाल करीत असल्याचे फातोर्ड्याचे माजी आमदार तथा मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले. 

करोनाच्या संकट काळात आर्थिक फटका बसलेल्या रिक्शा, पिकअप चालक, गाडा व्यापारी व इतर छोट्या व्यावसायिकांना मुख्यमंत्री मदत निधीतून फातोर्ड्यातील ८२ लाभार्थीना नाईक यांच्या हस्ते नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  
आपल्या २५ वर्षांच्या राजकीय प्रवासात भाजपने कधीच भेदभाव केला नाही. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा सदैव प्रयत्न केला. 

सूड आणि खोटारडेपणाच्या राजकारणाला कधीच थारा दिला नाही याचे श्रेय आपले कार्यकर्ते, मित्र परिवार आणि हितचिंतकाना जाते, असे नाईक पुढे म्हणाले.  फातोर्डा भाजप मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर यांनी स्वागत केले. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य वल्लभदास रायकर यांनी सूत्रसंचालन केले. अल्पसंख्यांक विभागाचे राज्य अध्यक्ष हैदर शाहा यांनी आभार मानले.  फातोर्डा मंडळाचे सरचिटणीस प्रमोद नाईक उपस्थित होते.

संबंधित बातम्या