Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्षपदासाठी भाजपचा उमेदवार ठरेना

12 रोजी निवडणूक; सदानंद नाईकांचाही दावा
Madgaon Mayor Election
Madgaon Mayor ElectionDainik Gomantak

Madgaon Mayor Election : मडगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक ‘गोमन्तक’ने अंदाज वर्तविलेली 12 ऑक्टोबर तारीख निश्‍चित झाली आहे. माहिती खात्याचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी पालिका प्रशासनातर्फे याबाबत आज नोटीस काढली. यावेळी हात दाखवून मतदान केले जाणार असले तरी ज्यांच्यासाठी हा अट्टाहास केला ते दामू शिरोडकरच भाजपचे उमेदवार असणार का?, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नगरसेवक सदानंद नाईक यांनीही दावा सांगितल्याने शनिवारी दिगंबर कामत सर्व भाजप नगरसेवकांची बैठक घेणार आहेत.

नगरपालिका संचालक गुरूदास पिळर्णकर यांनी या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी 11 वाजता बैठक घेण्यास सांगितले आहे. मंगळवार (ता.11) दुपारी 1 पर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्यात येतील. यावेळी निर्वाचन अधिकारी म्हणून पुन्हा एकदा सनदी अधिकारी विकास गावणेकर यांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, भाजप गटाच्या नगरसेवकांनी क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांचीही नानुटेल हॉटेलमध्ये भेट घेतली. मात्र, ती चर्चा विकासकामासाठी होती. पालिकेत कोण नगराध्यक्ष व्हावा यासाठी नव्हती, अशी माहिती काही नगरसेवकांनी दिली.

Madgaon Mayor Election
Govind Gaude : कला अकादमीच्या कामात भ्रष्टाचार दिसत असेल तर सिद्ध करा; गोविंद गावडेंचं थेट आव्हान

दामू शिरोडकर अद्याप काँग्रेसमध्येच!

दामू शिरोडकर हे भाजप गटाचे उमेदवार असताना भाजपच्याच पाच नगरसेवकांनी विरोधात मतदान करून त्यांना पाडले होते. या पार्श्‍वभूमीवर आता सदानंद नाईक यांनी आपल्याला संधी देण्याची मागणी केली आहे. कामत यांनी जरी भाजप पक्षात प्रवेश केला असला तरी दामू शिरोडकर यांनी अजून काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. मग ते भाजपचे उमेदवार कसे होऊ शकतात? असा दावा नाईक यांनी भाजप नेत्यांसमोर केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com