हे सायबेरियन पक्षी निवडणुकीपुरतेच!

हे स्थलांतरित पक्षी येऊन लोकांना विविध आश्वासने देत आहेत, पण ते निवडणुकीनंतर आपला गाशा गुंडाळून परत आपल्या गावात जातील.
हे सायबेरियन पक्षी निवडणुकीपुरतेच!
BJP Goa in charge Devendra Fadnavis likens of Trinamool Congress and Aam Aadmi Party to Siberian birdsDainik Gomantak

केपे: कडाक्याच्या थंडीत सायबेरियन पक्षी त्यांच्या मूळ जागेवरून दुसऱ्या ठिकाणी ऊब घेण्यासाठी जातात. त्याप्रमाणेच गोव्यातील निवडणुकीवर डोळा ठेवून काही राजकीय (Political) सायबेरियन पक्ष हे निवडणुकीनंतर निश्‍चित परत जातील, असा टोला भाजपचे (BJP) गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि ‘आप’ला (AAP) लगावला. बेतुल - केपे येथे कार्यकर्ता मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, केपेचे आमदार बाबू कवळेकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, केपे मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप, शाणु वेळीप, नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर, उनगराध्यक्ष विलियम फर्नांडिस व नगरसेवक प्रसाद फळदेसाई, दयेश नाईक, गणपत मोडक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये बेरोजगारीने कळस गाठला आहे. तिथे फक्त खंडणी वसूल करण्याचे काम सुरू आहे. अगोदर कमुनिस्ट पक्षांकडून लोकांची छळवणूक होत होती. तीच परंपरा ममतांनी कायम ठेवली आहे. दुसरीकडे ‘आप’चे नेते दिल्ली मॉडेलविषयी लोकांना चुकीची माहिती देत आहे. दिल्ली राज्याचा विकास केंद्रातील भाजप सरकार करत आहे. तेथील आरोग्य, वीज व शिक्षण या खात्यांचा विकासही केंद्राच्या निधीतून झाला आहे, असा दावा फडणवीसांनी केला. या फसवणूक करणाऱ्या पक्षांना गोव्यातील जनतेने त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

BJP Goa in charge Devendra Fadnavis likens of Trinamool Congress and Aam Aadmi Party to Siberian birds
'गोव्यातील अल्पसंख्यांकासाठी कॉंग्रेस महत्त्वाची भूमिका निभावणार'

फडणवीसांचे आवाहन कोणाला?

हे स्थलांतरित पक्षी येऊन लोकांना विविध आश्वासने देत आहेत, पण ते निवडणुकीनंतर आपला गाशा गुंडाळून परत आपल्या गावात जातील. त्यामुळे या पक्षांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन फडणवणीस यांनी केले. सध्या काही भाजपचे नेते पक्षावर नाराज आहेत. त्यांच्यासह पदाधिकारी तृणमूलच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फडणवीसांनी हे आवाहन नेमके नागरिकांना केले की त्यांच्याच पक्षातील नेत्यांना केले, याबाबत चर्चा रंगली आहे.

BJP Goa in charge Devendra Fadnavis likens of Trinamool Congress and Aam Aadmi Party to Siberian birds
गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत; काँग्रेस मात्र बुचकळ्यात

‘पक्ष्यां’च्या माध्यमातून विरोधी पक्षांवर निशाणा

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने राज्यात जोरदार मुंसडी मारली आहे. यामुळे स्थानिक भाजपसह काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, गोवा राज्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही पक्षांना सायबेरियन पक्ष्यांची उपमा देत शेलक्या शब्दांत टीका केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com