Goa BJP : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप दोन्ही जागा जिंकणार

कॉंग्रेसचे आमदार संपर्कात नाहीत!; सदानंद शेट तानावडेंचा दावा
BJP state president Sadanand Shet Tanavade
BJP state president Sadanand Shet TanavadeDainik Gomantak

Goa BJP : गोव्यातील लोकांचा विश्वास, हीच भाजपची खरी शिदोरी आहे. आम्ही लोकांना गृहीत धरत नाही. त्यांचा पक्षाप्रती विश्र्वास वाढविण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. लोकसभा निवडणुकीला पावणे दोन वर्षे बाकी आहेत. पण आम्ही लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मडगावात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

लोकसभेसाठी आमची तयारी सुरू झाली असून पक्षांतर्गत संघटनांनी मोर्चेबांधणी केली आहे. लोकसभेसाठी भाजपचे कोण उमेदवार हे अद्याप निश्‍चित केलेले नाही, असेही तानावडे यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये प्रवेश करू इच्छितात, यावर तानावडे म्हणाले, की कॉंग्रेसच्या एकाही आमदाराने आमच्याशी संपर्क साधलेला नाही. आम्ही काँग्रेस आमदारांच्या पक्षबदलाच्या बातम्या केवळ प्रसिद्धी माध्यमांतूनच ऐकत आहोत.

BJP state president Sadanand Shet Tanavade
Goa Congress : काँग्रेस विधिमंडळ गट नेतेपदी युरी आलेमाव यांची वर्णी शक्य

नगरसेवक प्रवेश, हे स्थानिक राजकारण

पुढील विधानसभा निवडणुकीत मडगावात भाजपचाच उमेदवार निवडून येईल. त्यासाठी आम्ही मडगाव मंडळाची मजबूत बांधणी करणार असून कार्यकर्त्यांचा विश्र्वास मिळविण्याचा आमचा प्रयत्न असेल. मडगावचे चार नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याविषयी तानावडे म्हणाले, की त्यांच्या प्रवेशाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. हे स्थानिक राजकारण आहे. यात आम्ही खोलात जात नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com