दक्षिण गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप स्वबळावर

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 14 डिसेंबर 2020

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत पुन्हा भाजपचीच सत्ता असणार आहे. भाजपचे 13 उमेदवार निवडून आल्याने भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

मडगाव- दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत  पुन्हा भाजपचीच सत्ता असणार आहे. भाजपचे 13 उमेदवार निवडून आल्याने भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 

मुख्य विरोधक असलेल्या काँग्रेसला केवळ तीनच जागा मिळवता आल्या आहेत. मगोने 2, राष्ट्रवादी काँग्रेसने 1, तर अपक्ष उमेदवारांनी 2 जागा जिंकल्या आहेत. अद्याप तीन जागांचे निकाल हाती  यायचे आहेत. 
एकूण 24 संख्याबळ असलेल्या दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीत भाजपने 13 जागा पटकावल्या आहेत. मतमोजणी सुरु असताना संख्याबळ अपूर्ण पडण्याची शक्यता असल्याने भाजपकडून एका अपक्षाकडे बोलणी सुरु करण्यात आली होती होती. तथापि, भाजपचे 13 उमेदवार निवडून आल्याने भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार आहे. 

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या 25 पैकी 23 मतदारसंघांत मतदान झाले होते. एका उमेदवाराचे निधन झाल्याने नावेली मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. तर साकवाळ मतदारसंघातून अनिता थोरात (भाजप) यांची बिनविरोध निवड झाली होती. 

आतापर्यंत प्राप्त झालेले निकाल

एकूण विजयी उमेदवार

 भाजप - 13, काँग्रेस 3, मगो 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 2

भाजपचे विजयी उमेदवार

1) साकवाळ - अनिता थोरात (बिनविरोध)
2) दवर्ली  - उल्हास तुयेकर 
3) शेल्डे - सिद्धार्थ गावस देसाई
4) उसगाव गांजे - उमाकांत गावडे
5) सावर्डे - सुवर्णा तेंडुलकर
6) गिरदोली - संजना वेळीप
7) खोला - शाणू वेळीप 
8) बेतकी खांडोळा - श्रमेश भोसले
9) रिवण - सुरेश केपेकर
10) बार्शे - खुशाली वेळीप 
11) पैगीण - शोभना वेळीप
12) बोरी - दीपक नाईक बोरकर
13) धारबांदोडा - सुधा गोविंद गावकर 

काँग्रेसचे विजयी उमेदवार 

1) नुवे -  आसुसियाना राॅड्रिग्ज
2) कुडतरी - मिशेल रिबेलो
3) वेळ्ळी - ज्युलियावर फर्नांडिस

 मगोचे विजयी उमेदवार 

1) कवळे - गणपत नाईक
2) कुर्टी - प्रिया च्यारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार 

1) कोलवा - वानिया बाप्तिस्त

अपक्ष विजयी उमेदवार 

1) कुठ्ठाळी - आतोन वाझ
2) राय - डॉमनिक गावकर

संबंधित बातम्या