Goa: भाजप सरकारकडून 'आप' मॉडेलची नक्कल

सावंत सरकार राबवत असलेली योजना ‘आप’ (AAP) ची नक्कल असून, यात माहिती आणि नियोजनाचा अभाव आहे.
Goa: भाजप सरकारकडून 'आप' मॉडेलची नक्कल
‘सरकार तुमच्‍या दारी’च्‍या माध्‍यमातून राज्य सरकार ‘केजरीवाल मॉडेल (Arvind Kejriwal model) ऑफ गव्हर्नन्स’ची नक्‍कल करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहे.Dainik Gomantak

पणजी: ‘सरकार तुमच्‍या दारी’च्‍या माध्‍यमातून राज्य सरकार ‘केजरीवाल मॉडेल (Arvind Kejriwal model) ऑफ गव्हर्नन्स’ची नक्‍कल करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहे, असा आरोप पक्षाचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक (Valmiki Naik) यांनी पत्रकार परिषदेत केला.

 ‘सरकार तुमच्‍या दारी’च्‍या माध्‍यमातून राज्य सरकार ‘केजरीवाल मॉडेल (Arvind Kejriwal model) ऑफ गव्हर्नन्स’ची नक्‍कल करण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहे.
Goa: ‘आप’च्या रॅलीत युवकांचा वरचष्मा

नाईक म्हणाले, की मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रत्यक्षात कोणत्याही योजनेबाबत गंभीर नाहीत. त्यांना केवळ कॅमेऱ्यासमोर बोलायचे असते. विविध सरकारी सेवांसाठी गोवेकरांना प्रतीक्षा आणि रांगा लावाव्या लागतात. सावंत सरकार राबवत असलेली योजना ‘आप’ (AAP)ची नक्कल असून, यात माहिती आणि नियोजनाचा अभाव आहे.

दिल्लीत घरपोच दिल्या जाणाऱ्या सरकारी सेवांची माहिती वाल्मिकी नाईक यांनी दिली. दिल्लीतील नागरिकांना टोल फ्री क्रमांकाद्वारे घरपोच सरकारी सेवा उपलब्ध होते. दिल्लीत 1076 क्रमांकावर संपर्क केल्यानंतर सरकारी कर्मचारी नागरिकांच्या घरी कागदपत्रे गोळा करण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी, तपशील स्कॅन करण्यासाठी आणि पावती प्रदान करण्यासाठी येतात. आरटीओचे 99 टक्के काम घराघरांत पोहोचवले जाते. त्‍यामुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे, असे सांगून नाईक म्‍हणाले, की मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांच्या राजकीय प्रचारावर होणारा करदात्यांच्या पैशाचा अपव्यय थांबवावा. सरकारने जनसंपर्क मोहीम थांबवावी आणि त्याऐवजी गोवेकरांसाठी काम करावे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com